ETV Bharat / health-and-lifestyle

हृदविकाराचा धोका कमी करू शकता? 'या' गोष्टींकडे द्या लक्ष - WAYS TO REDUCE RISK OF HEART ATTACK

हृदय विकारचा धोक्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. परंतु हा धोका तुम्ही कमी करू शकता. वाचा सविस्तर..,

Enter here.. WAYS TO REDUCE RISK OF HEART ATTACK  THINGS TO PREVENT A HEART ATTACK  CAUSES OF HEART DISEASE  HOW TO DECREASE HEART ATTACK RISK
हार्ट अटॅक (Freepik)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Feb 4, 2025, 4:26 PM IST

Ways To Reduce Risk Of Heart Attack: हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी वृद्धांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त होते, परंतु आज तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येणे सामान्य झाले आहे. अस्वास्थ्यकर जीवनशैली, खराब आहार आणि व्यायामाचा अभाव हे सर्व घटक हृदयविकाराला कारणीभूत ठरतात. हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा हृदयाच्या धमन्या बंद होतात आणि हृदयाकडे रक्त प्रवाह अवरोधित होतो. उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलमुळेही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही दररोज काय करू शकता ते जाणून घ्या.

  • आरोग्यदायी आहार: हृदयाच्या आरोग्याला पोषक असे पदार्थ खा. जसे की, आहारात फळे, भाज्या आणि निरोगी चरबीचा समावेश करा. मीठ, साखर आणि सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असलेले पदार्थ टाळा. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलचा धोका वाढू शकतो. परिणामी हार्ट अटॅक येतो.
  • व्यायाम करा: चालणे, सायकलिंग आणि पोहणे यासारख्या शारीरिक हालचाली हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. नियमित व्यायामामुळे वजन, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. त्यामुळे नियमित किमान ३० मिनिटे व्यायाम करा.
  • तणाव टाळा: हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करणारी एक गोष्ट म्हणजे तणाव. त्यामुळे तणाव टाळणे गरजेचे आहे. ध्यान आणि योगा यांसारख्या विश्रांतीची तंत्रे तणाव कमी करण्यास मदत करू शकतात. तुम्हाला आवडत असलेले व्यायाम करा. तसंच प्रियजनांसोबत वेळ घालवल्यानं देखील तणावाचे व्यवस्थापन करण्यात मदत होवू शकते.
  • धूम्रपान सोडा: हृदयविकारासाठी धूम्रपान करणे अतिशय वाईट आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका दूर करण्यासाठी धूम्रपान सोडा.
  • निरोगी वजन: हृदयाच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी निरोगी वजन राखणे महत्त्वाचे आहे. जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वजन योग्य ठेवा तसंच पोटावरील चरबी वाढू देवू नका.'
  • अल्कोहोलचे सेवन कमी करा: जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकार होऊ शकतो. तसंच त्यामुळे वजनही वाढू शकते. यामुळे दारूचे सेवन मर्यादित ठेवा.
  • पुरेशी झोप: हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी चांगली झोप घेणे महत्त्वाचे आहे. झोपेच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. त्यामुळे वजनही वाढेल. परिणामी हृदयविकार धोका वाढतो. त्यामुळे दररोज ७ ते ९ तासांची झोप घ्या.
  • हायड्रेटेड राहा: शरीरात पुरेसे हायड्रेशन राखणे महत्वाचे आहे. हे रक्त परिसंचरण सुधारण्यास आणि हृदयावरील ताण कमी करण्यास मदत करते. त्यासाठी भरपूर पाणी प्या. दररोज किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. जास्त गोड सोडा आणि एनर्जी ड्रिंक्स टाळा.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC6378495/

हेही वाचा

  1. हृदयविकार ते कर्करोगापासून बचाव करण्यासाठी 'काळी द्राक्षे' फायदेशीर
  2. हृदयविकार टाळू शकतो 'ABCDEF' फॉर्म्युला; एकदा वापरून पहाच
  3. शेवग्याची पानं चघळण्याचे चमत्कारिक फायदे; 'या' आजारापासून होते सुटका - Benefits Of Moringa Leaves
  4. हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी बीट फायदेशीर; जाणून घ्या बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.