ETV Bharat / state

चंद्रपुरातील कथित बोगस मतदारांच्या प्रकरणाचं पुढं काय झालं? राजुरा विधानसभेत झाला होता घोळ - BOGUS VOTING IN MAHARASHTRA

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 70 लाखांहून अधिक नवमतदारांची नोंद झाली. यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संशय व्यक्त केल्यानं हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

BOGUS VOTING IN MAHARASHTRA
ईव्हीएम मशीन (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2025, 5:51 PM IST

चंद्रपूर : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत 70 लाखांहून अधिक नवमतदारांची नोंद झाली. यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संशय व्यक्त केल्यानं हा मुद्दा आता पुन्हा चर्चेला आला आहे. ज्या-ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार जिंकले त्याच ठिकाणी सर्वाधिक मतदारांची नोंदणी झाली, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

राजुरी विधानसभेत कथित बोगस मतदान : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात कथित बोगस मतदारांचा असाच प्रकार समोर आला होता. यात 6 हजारांपेक्षा जास्त बोगस मतदान झाल्याचं समोर आलं होतं. जिल्हा निवडणूक प्रशासनानं ही बाब निदर्शनास आल्यानंतर निवडणूक यादीतून ही नावं हटवून याबाबत गुन्हा नोंदवला होता. मात्र चार महिने लोटूनही हा प्रकार कोणी केला याचा थांगपत्ता प्रशासनाला लागलेला नाही.

काय आहे प्रकरण : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात 38 हजार 637 नव्या मतदारांची नोंद झाली. यापैकी राजुरा विधानसभा क्षेत्रात जवळपास 11 हजार नव्या मतदारांचा समावेश झाला. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर राजुरा विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात अचानक काही अनोळखी व्यक्तींची नावं समाविष्ट करण्यात आल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं. विशेषतः ही नावं अमराठी व्यक्तींची होती. याबाबत संशय आला असता बीबी, गडचांदूर, कोरपना या ठिकाणी जे लोक तिथं राहातच नाहीत अशा व्यक्तींची नावं मतदार यादीत असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांनी या संपूर्ण मतदारांची तपासणी अधिकाऱ्यांकडून करून घेतली असता यात 6 हजार 866 मतदारांची बोगस पद्धतीनं नावं आल्याचं समोर आलं. यानंतर ही नावं मतदार यादीतून वगळण्यात आली. तसंच याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार देवराव भोंगळे हे जिंकले तर काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुभाष धोटे पराभूत झाले होते.

प्रशासनाची चालढकल करणारी भूमिका : राजुरा विधानसभा क्षेत्रात जी मतदारांची नोंदणी झाली ती नेमकी कुठून झाली, असं करणारे आरोपी नेमके कोण आहेत? याचा तपास प्रशासन अद्याप करू शकलं नाही. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना विचारणा केली असता ते नेहमी तपास सुरू आहे असं सांगतात. मात्र, यात ठोस अद्याप काहीच समोर आलं नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी दिली.

काय म्हणाले जिल्हाधिकारी : या प्रकरणाबाबत बोलताना जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, "याबाबतचा तपास नेमका कुठवर आलाय याबाबतची माहिती नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत. त्यामुळं याबाबत पोलीस विभागच अधिक सांगू शकेल" अशी प्रतिक्रिया दिली. तर, या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा :

  1. ...तर 'लाडकी बहीण योजने'चा हप्ता होणार रद्द; लाडक्या बहिणींच्या घरी होणार तपासणी
  2. टाटा मोटर्सची महाराष्‍ट्र सरकारसोबत जलस्रोत संवर्धनांसाठी हातमिळवणी
  3. महाराष्ट्रातील पीकवीमा घोटाळा लोकसभेत; केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.