ETV Bharat / state

डिजिटल स्वरुपात सुरू होणार डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ! अंनिसच्या राज्य कार्यकारिणीत कोणते ठराव झाले? वाचा बातमी - DR NARENDRA DABHOLKAR LOK VIDYAPITH

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच रत्नागिरीमध्ये झाली. या बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समाजात रुजवण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

Dr Narendra Dabholkar Lok Vidyapith
डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ स्थापन (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2025, 7:50 PM IST

सातारा : समाजात नव्या शैक्षणिक माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व्हावा म्हणून अंनिसतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून विविध ऑनलाईन कोर्सेसचा अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला जाणार आहेत. रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत यासंदर्भातील ठराव घेण्यात आला असल्याची माहिती अंनिसच्यावतीनं देण्यात आली आहे.

राज्य कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक दि. १ आणि २ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत झाली. बैठकीसाठी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव, राज्य विभागाचे कार्यवाह, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, सल्लागार मंडळाचे सदस्य आणि क्रियाशील कार्यकर्ते आदी १७ जिल्ह्यांतील १२५ अंनिस कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकारिणीच्या बैठकीत महत्वाचे सहा ठराव घेण्यात आले.

अंनिसच्या बैठकीतील महत्वाचे सहा ठराव : अंनिसच्या राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये संघटनेच्या पुढील कामाची दिशा ठरविण्याच्या संदर्भाने महत्त्वाचे सहा ठराव घेण्यात आले. १) अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा समाजात नव्या शैक्षणिक माध्यमातून प्रचार व्हावा म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ स्थापन करणे, त्याद्वारे विविध ऑनलाईन कोर्सेसचे अभ्यासक्रम उपलब्ध करुन देणे, २) जादूटोणा विरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर होण्यासाठी देश पातळीवर पाठपुरावा करणे, ३) अंधश्रध्देविषयी प्रबोधन अभियान राबवणे, ४) आंतरजातीय, आंतरधर्मीय, सत्यशोधकी विवाह करू इच्छिणाऱ्याऱ्यांची माहिती संकलित करून, अंनिसच्या राज्यस्तरीय आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह वधू वर सूचक मंडळाचे काम सुरू करणे, ५) जोडीदाराची विवेकी निवड आणि मानसिक आरोग्य, या विषयी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे, ६) सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा आणि मोबाईलचे व्यसन या विषयी काम करण्यावर भर देणे.

नागपुरात मार्चमध्ये अंधश्रध्दा निर्मूलन महिला परिषद : विदर्भातील नागपूरमध्ये राज्यव्यापी अंधश्रद्धा निर्मूलन महिला परिषद घेण्याचं देखील अंनिसच्या बैठकीत निश्चित करण्यात आलं. तसेच अंनिसच्यावतीनं फेब्रुवारी आणि मे २०२५ असे दोन महिने संघटना बांधणी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत दोन प्रतिनिधी महाराष्ट्रातील अंनिसच्या सर्व शाखांना भेटी देतील.

आरोग्य, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सन्मान : रत्नागिरीतील कार्यकारिणीच्या बैठकीला समाजवादी कार्यकर्ते अभिजीत हेगशेट्ये, नित्यानंद भुते उपस्थित होते. यावेळी रत्नागिरीमध्ये आरोग्य, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या पाच कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. दुपारच्या सत्रात राज्य कार्यकारी समिती सदस्य ॲड. मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलासकर यांनी अंनिसतर्फे राबवलेल्या उपक्रमांच्या अहवालाचं वाचन केलं. राज्यभरातील जिल्हा कार्याध्यक्ष, सचिवांनी जिल्ह्याचा कार्य अहवाल सादर केला.

'अंनिस'च्या विभागवार कामांचा आढावा : अंनिसच्या राज्य कार्यकारिणी समितीचा महिला विभाग, प्रकाशन, संघटना बांधणी आणि प्रशिक्षण, बुवाबाजी संघर्ष, मानसिक आरोग्य, विविध उपक्रम, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह आणि सांस्कृतिक विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीचे संयोजन विनोद वायंगणकर, राहुल थोरात, राधा वणजू, वल्लभ वणजू, मधुसूदन तावडे, अतुल तांबट, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, प्रा. प्रवीण देशमुख, सम्राट हटकर यांनी केले. बैठकीस दीपक गिरमे, गणेश चिंचोले, डॉ. हमीद दाभोलकर, राजीव देशपांडे, रामभाऊ डोंगरे उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून आरोपीसह सीबीआयला नोटीस - Narendra Dabholkar killing
  2. गुजरातने जादूटोणा विरोधी कायदा पास करणे स्वागतार्ह, राष्ट्रीय पातळीवरही कायदा करा - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी - Anti Witchcraft Act
  3. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणात 11 वर्षानंतर निकाल, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप - Narendra Dabholkar Case Verdict

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.