नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्रासह देशातील विविध मुद्द्यांवरुन राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप केले. या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची मोदींनी पाढा वाचला.
#WATCH | In Lok Sabha, PM Modi says, " a woman president is being humiliated, i can understand the political frustration. but what is the reason why the president is being insulted? what is the reason...today, india is moving ahead leaving this kind of distorted mentality and… pic.twitter.com/9pJu7twbGB
— ANI (@ANI) February 4, 2025
दिल्लीतून एक रुपया निघायचा, 15 पैसे गावात पोहचायचे : "आपल्या देशात एक पंतप्रधान होऊन गेले त्यांना 'मिस्टर क्लिन' म्हटलं जायचं. त्यांनीच हे म्हटलं होतं की दिल्लीतून जेव्हा एक रुपया निघतो तेव्हा गावांमध्ये १५ पैसे पोहचतात. त्या कालावधीत तर पंचायत ते पार्लमेंट एकाच पक्षाचं राज्य होतं. त्यावेळी त्याच पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं होतं. अत्यंत खुबीने केलेली ती हातसफाई होती. १५ पैसे कुणाकडे जात होते ते पण सामान्य माणसांना माहीत आहे. आता देशाने आम्हाला संधी दिली आम्ही समस्यांवर उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. बचतही करायची आणि विकासही करायचा हे आमचं मॉडेल आहे. जनतेचा निधी जनतेसाठी वापरला आहे," असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
#WATCH | PM Narendra Modi says, " while discussing the president's address, foreign policy was also discussed here. a few people think that they don’t appear mature if they don’t speak on foreign policy. they think that they should definitely speak on foreign policy, even if it… pic.twitter.com/LDXPl0c3q4
— ANI (@ANI) February 4, 2025
विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ : "मी खूप भाग्यवान आहे की देशाच्या जनतेनं मला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देण्याची संधी दिली. त्यामुळं मी आदरपूर्वक जनतेचे आभार मानतो. आपण आता 2025 मध्ये आहोत. एकप्रकारे 21 व्या शतकातील 25% निघून गेले आहेत. 20 व्या शतकात आणि 21 व्या शतकातील पहिली 25 वर्षे काय झालं ते काळच ठरवेल. पण जर आपण राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा बारकाईनं अभ्यास केल्यावर त्यांनी आगामी २५ वर्षांच्या संदर्भात लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याविषयी सांगितलं आणि त्यांचं भाषण विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ करतं हे स्पष्ट होतं," असं म्हणत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींच्या भाषणाचं कौतुक केलं.
#WATCH | PM Narendra Modi says, " for some people, speaking about caste is fashion. for the last 30 years, obc mps have been demanding that obc commission be granted constitutional status. those who see a benefit in casteism today did not think of the obc community back then. we… pic.twitter.com/3qBmyrRbOF
— ANI (@ANI) February 4, 2025
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
- आम्हाला महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाला इतकं मोठं बहुमत मिळालं.
- आतापर्यंत गरिबांना 4 कोटी घरं दिली आहेत. जे कष्टाचे जीवन जगत आहेत त्यांनाच समजतं की घर मिळण्याची किंमत काय आहे. शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळं पूर्वी महिलांना खूप त्रास सहन करावा लागला होता. ज्यांच्याकडं या सुविधा आहेत ते या समस्या समजू शकत नाहीत. आम्ही 12 कोटींहून अधिक शौचालये बांधली आहेत.
- तरुणांचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून आम्ही सातत्यानं काम करत आहोत. पण काही पक्ष असे आहेत जे तरुणांची फसवणूक करत आहेत. निवडणुकीच्या वेळी आश्वासनं देतात, पण ती आश्वासनं ते पूर्ण करत नाहीत. आमचं सरकार आल्यावर तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. हरियाणात तिसऱ्यांदा विजय, महाराष्ट्रातही आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला. जनतेचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत.
- आम्ही अणुऊर्जा क्षेत्र खुलं केलं. त्याचे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम देशासाठी भविष्यात दिसून येतील. आम्ही शाळांमध्ये 10,000 टिंकरिंग प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत. या प्रयोगशाळांमधील मुलं त्यांच्या रोबोटिक्स नवकल्पनांनी सर्वांना आश्चर्यचकित करत आहेत, या अर्थसंकल्पात आणखी वाढ करण्यासाठी 50,000 नवीन टिंकरिंग लॅबसाठी तरतूद करण्यात आली आहे. भारत हा असा देश आहे ज्याच्या 'एआय' मिशनसाठी जग आशावादी आहे.
- एका महिला राष्ट्रपतींचा अपमान होतोय, मी राजकीय नैराश्य समजू शकतो. पण राष्ट्रपतींचा अपमान कशामुळे होतोय? कारण काय? एक प्रकारची विकृत मानसिकता आहे. आम्ही महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाचा मंत्र पुढे नेत आहोत.
- राज्यघटनेने सर्वांसाठी उत्तम आरोग्यसेवा सुनिश्चित केली आहे. आज कर्करोग दिन देखील आहे, आणि जगभरात, आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे. आमचा सतत प्रयत्न आहे की, प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक योजनेतून 100 टक्के फायदा झाला पाहिजे. पण काही लोक तुष्टीकरणाचे राजकारण करतात. प्रत्येक समाजाच्या आणि प्रत्येक वर्गाच्या लोकांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. 'आयुष्मान भारत योजनें'तर्गत रुग्णांना मोफत उपचार मिळतात, पण काही राजकीय पक्ष त्यांच्या संकुचित मानसिकतेमुळे गरिबांसाठी रुग्णालयांचे दरवाजे बंद करू पाहतात.
- विकसित भारतचं लक्ष पार करायचं आहे. ही तर आमची तिसरी टर्म आहे. विकसित भारत, आधुनिक भारत करण्यासाठी पुढील अनेक वर्ष आम्ही एकत्र असू, देशापुढं कोणीही मोठं नाही. आम्ही मिळून विकसित भारत बनवू.
हेही वाचा -