जयपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित 'छावा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता विकी कौशल जयपूरला पोहोचला आहे. राज मंदिर येथे विकीनं चाहत्यांमध्ये चित्रपटाचे प्रमोशन केलं. या चित्रपटाचं प्रमोशन करताना त्यानं खंबाघनी म्हणत, हर हर महादेवचा जयजयकार केला. यानंतर त्यानं आपल्या चित्रपटाबद्दल काही विशेष गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर केल्या. तसेच राज मंदिरातच त्यानं चित्रपटाचा प्रोमो व्हिडिओ देखील प्रदर्शित केला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या पीरियड ड्रामामध्ये विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नाना मुख्य भूमिकेत आहेत. तसेच अक्षय खन्ना या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये 'छावा'बद्दल प्रचंड क्रेझ आहे.
विकी कौशल स्टारर 'छावा' : विकी कौशल स्टारर 'छावा' चित्रपटाची क्रेझ राज मंदिरात देखील पाहायला मिळाली. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. यापूर्वी विकीनं दोन वेळा आपल्या चित्रपटांच्या हिटसाठी राजस्थानला भेट दिली आहे. त्यानं 'जरा हटके जरा बचके' आणि 'सॅम बहादूर'चं देखील राजस्थानमध्ये प्रमोशन केलं होतं. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विकी म्हणतो, "छावा चित्रपट आपल्या देशाचे महान योद्धा, महान राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित आहे." संभाजी महाराजांचे कौतुक करत त्यानं पुढं म्हटलं, "या चित्रपटात त्यांच्या शौर्यपूर्ण प्रवासाची एक शक्तिशाली झलक दाखवण्यात आली आहे." याशिवाय त्यानं हे देखील सांगितलं की, तो मंगळवारी संपूर्ण दिवस जयपूरमध्ये राहणार आहे. दरम्यान या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि गाणं अनेकांना आवडलं होतं. लोकांकडून रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाला खूप प्रेम मिळात आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ढोल वाजवून विकी कौशलचं झालं स्वागत : याआधी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ढोल वाजवून विकी कौशलचं स्वागत करण्यात आलं होतं, ज्यावर विकी कौशलनेही नाचायला सुरुवात केली होती. याशिवाय राज मंदिरावर भगवे झेंडे देखील फडकवण्यात आले. विकी आल्यानंतर लोकांनी हर हर महादेवचा जयघोष केला. तसेच तिथे उपस्थित असणाऱ्यांनी विकी कौशलला त्याच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा :