हैदराबाद : Apple चे सीईओ टिम कुक यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सेवा भारतात लाँच करणार असल्याची घोषणा केलीय. एप्रिलमध्ये हे फीचर भारतात लॉंच होणार आहे. Apple Intelligence असी ही सेवा असेल. ही सेवा इंग्रजी भाषेत रोलआउट केली जाणार असून नंतर ती हळूहळू इतर भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.
Tim Cook म्हणाले की Apple Intelligence वर खूप मेहनत घेतली जात आहे. एप्रिलमध्ये, आम्ही Apple Intelligence मध्ये अधिक भाषेंचा सपोर्ट जोडणार आहोत. त्यात फ्रान्स, इटली, पोर्तुगाल, स्पेन, जपान कोरिया आणि चिनी भाषा देखील आहेत. यासोबतच, आम्ही भारत आणि सिंगापूरमध्ये स्थानिक इंग्रजी आणत आहोत.
अनेक नवीन वैशिष्ट्ये
Apple Intelligence अंतर्गत, वापरकर्त्यांना अनेक नवीन वैशिष्ट्ये पाहायला मिळतील, यामध्ये Siri देखील पूर्वीपेक्षा अधिक अपडेट केली जाईल. यासह, वापरकर्त्यांना AAAI-संचालित लेखन साधने, स्मार्ट उत्तरे, सूचना सारांश आणि प्रतिमाची सेवा यात मिळेल. Apple Intelligence वैशिष्ट्ये वापरकर्त्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, मात्र त्यासाठी तुमच्या फोनमध्ये अधिक जागा असायला हवी. यामध्ये, वापरकर्त्यांना 7GB स्टोरेज पाहता येईल. Apple Intelligence इतर मोबाइल AI प्लॅटफॉर्मपेक्षा बरेच वेगळं असेल. वापरकर्त्यांची गोपनीयता आणि y सुरक्षा लक्षात घेऊन, काही वैशिष्ट्ये डिव्हाइसवर कार्य करतील.
या आयफोन्सवप वापरता येणार Apple Intelligence
Apple Intelligence फक्त iPhone 16 मालिका, iPhone 16 Pr,o आणि iPhone 15 Pro मॉडेल्ससाठी उपलब्ध असेल. Apple Intelligence वैशिष्ट्ये अद्याप भारतीय वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाहीत.
हे वाचलंत का :