मुंबई- आशियातील सर्वात मोठी महानगरपालिका अशी ओळख असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प (BMC budget news) सादर झाला आहे. प्रशासकीय राजवटीतील आजपर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर्षी पालिकेने तब्बल 74,427 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मागील वर्षीच्या म्हणजे वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत 14.19 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
₹ बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन २०२५-२०२६ चे अर्थसंकल्पीय अंदाज महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 4, 2025
₹ The Budget Estimates for the year 2025-2026 are available on BMC Webportal.
🔗https://t.co/lNpF8MTbbP #BMCBudget2025_2026#BMCBudget@CMOMaharashtra@mieknathshinde… pic.twitter.com/OLj9weUIkn
अर्थसंकल्पात काय आहेत तरतुदी?
- बृहन्मुंबईच्या यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी 3 हजार 955 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- बेस्ट उपक्रमाला 1 हजार कोटी देण्यात आले आहेत. तर, रस्ते आणि वाहतूक खात्यासाठी 5 हजार 100 कोटींची कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- मुंबईत पालिकेचे विविध प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांसाठीदेखील विशेष तरतूद यावर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
- कोस्टल रोडचा तिसरा टप्पा म्हणजे दहिसर ते भाईंदर उन्नत मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 4 हजार 300 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1 हजार 957 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- बेस्ट उपक्रमातून दररोज सुमारे 3 हजार बसमधून 30 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली जाते. बेस्टच्या आर्थिक स्थितीचा विचार करून 1 हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात प्रस्तावित केली आहे.
- अर्थसंकल्पीय कागदपत्रांनुसार बेस्टला देण्यात येणारा निधी पायाभूत सुविधा, विकास, भांडवली उपकरणे खरेदी, कर्ज परतफेड, भाडेपट्ट्याच्या बसेस, वेतन सुधारणा, दैनंदिन कामकाज, कर्मचाऱ्यांचे दिवाळी बोनस, पेन्शनधारकांची देणी आणि वीज बिलांसाठी वापरला जाणे अपेक्षित आहे.
- बीएमसीकडून बेस्टला 2012-13 पासून 11,304.59 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर बेस्टला सुमारे 9,500 कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे.
हेही वाचा-