महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

तुम्हालाही शांत झोप येत नाहीय का? ऍपल वॉचमधील स्लीप एपनिया डिटेक्शन ठेवणार तुमच्या झोपीवर लक्ष - Apple Watch Series 10 Launch - APPLE WATCH SERIES 10 LAUNCH

Apple Watch Series 10 Launch : Apple नं Apple Watch Series 10 लाँच करून नवीन स्लीप एपनिया डिटेक्शन फीचर सादर केलं आहे. वापरकर्त्यांना स्लीप एपनियाचा त्रास होत, असल्यास हे डिटेक्शन फीचर त्यांच्या झोपेच्या वेळी श्वासोच्छवासावर लक्ष ठेवणार आहे. त्यामुळं स्लीप एपनियावर वापरकर्त्यांना वेळेवर उपचार करता येणार आहे.

Apple Watch Series 10 Launch
Apple Watch Series 10 Launch (Apple)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2024, 3:12 PM IST

हैदराबाद Apple Watch Series 10 Launch : जगभरातील 936 दशलक्षाहून अधिक प्रौढांना स्लीप एपनियाचा त्रास आहे, असं नॅशनल कौन्सिल ऑन एजिंग यांनी दावा केलाय. अनेकांना याबाबत माहिती नसल्यामुळं अनेकांचं लवकर निदान होत नाही. ज्यामुळं आरोग्याला अधिक धोका निर्माण होतो. AIIMS नवी दिल्लीच्या 2023 च्या अभ्यासानुसार, एकट्या भारतात, 104 दशलक्ष प्रौढ नागरिकांना या आजाराचा त्रास आहे. पण स्लीप एपनिया म्हणजे काय? Apple चं नवीन स्लीप एपनिया डिटेक्शन फिचर काय आहे? या आजाराची काय लक्षणे आहेत?, याबाबत आज आपण माहिती घेऊया.

ऍपल वॉच (Apple)

श्वासोच्छवासाचा रेकॉर्ड ठेवणार :ऍपल वॉच सिरीज 10 एक्सेलेरोमीटरचा वापर करून वापरकर्त्याच्या श्वासोच्छवासाचा रेकॉर्ड ठेवणार आहे. नवीन अपडेटसह, वापरकर्ते त्यांच्या आयफोनवरील हेल्थ ॲपमध्ये त्यांच्या श्वासोच्छवासातील अडथळाच्या ग्राफ पाहू सकता. हा डेटा एक महिना, सहा महिने, एक वर्ष कालावधीसाठी माहिती प्रदान करतो. त्यामुळं वापरकर्त्यांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार घेण्यास मदत होईल, असं ऍपलनं स्पष्ट केलंय.

ऍपल वॉच (Apple)

श्वासोच्छवासात व्यत्यय :स्लीप एपनिया हा एक गंभीर झोपेचा विकार आहे. या आजारामुळं जगभरातील लाखो लोकांना त्रास सहन करावा लागतोय. झोपेच्या दरम्यान श्वासोच्छवासात व्यत्यय येतो. ही सामान्य वाटणारी घटना तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते. स्लीप एपनियाच्या मूळ कारणांचा शोध न घेता त्याकडं दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. स्लीप एपनियाचं निदान झालेल्यास अयोग्य व्यवस्थापन करण्यात मदत होते.

ऍपल वॉच (Apple)

स्लीप एपनिया म्हणजे काय? :झोपेच्या दरम्यान श्वासोच्छवासात वारंवार अडथळा येत असल्यास त्याला स्लीप एपनिया असं म्हणतात. ज्याला ऍपनिया म्हणूनही ओळखलं जातं, काही सेकंदांपासून ते एका मिनिटापेक्षा जास्त काळ स्लीप एपनिया तुम्हाला होऊ शकतो. झोपेच्या दरम्यान श्वासोच्छवास अर्धवट किंवा पूर्णपणे कोंडला जातो. त्यामुळं तुम्ही शांत झोपू शकत नाही. यातील सर्वात सामान्य प्रकार म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA). हा घशाच्या मागील बाजूचे स्नायू शिथिल झाल्यावर उद्भवतो. ज्यामुळं श्वासोच्छवासातल अडथळा येतो. दुसरा प्रकार, सेंट्रल स्लीप एपनिया (CSA), श्वास नियंत्रित करणाऱ्या स्नायूंना मेंदू योग्य सिग्नल पाठवण्यात अपयशी ठरतो, तेव्हा सेंट्रल स्लीप एपनिया होतो. स्लीप एपनिया हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी आजार, स्ट्रोक, मधुमेह आणि झोपेच्या व्यत्ययादरम्यान मेंदूच्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं होणारा आजार आहे.

ऍपल वॉच (Apple)

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA) ची कारणं : स्लीप एपनियाचा सर्वात प्रचलित प्रकार म्हणजे (ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया ). त्याचं मूळ कारण श्वासोच्छवासाचेकार्य, तुमच्या जीवनशैलीशी निगडीत असतं.

ऍपल वॉच (Apple)

1. एअरवे ॲनाटॉमी आणि आकार :ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाचे प्राथमिक कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीची श्वासच्छावासाची रचना. जेव्हा आपण झोपतो तेव्हा, स्लीप एपनिया असलेल्या व्यक्तींमध्ये, श्वसनमार्ग नैसर्गिकरित्या अरुंद असू शकतो. तसंच आपल्या घशातली वाढलेलं टॉन्सिल किंवा एडेनोइड्स सारखे संरचनात्मक घटक श्वास घेण्यात अडथळा आणू शकतात. जाड मान, वाढलेलं वजन यामुळं देखील एपनिया होण्याचा धोका जास्त असतो.

2. स्नायू शिथिलता आणि चरबीचे वितरण : झोपेच्या वेळी, जीभ टाळू नियंत्रित करणारे स्नायू शिथिल होतात. जर हे स्नायू खूप शिथिल झाले, तर श्वास घेण्यात अडथळा आणू शकतात. याव्यतिरिक्त, जे लोक लठ्ठ आहेत, त्यांच्या गळ्यात आणि घशाच्या आसपास चरबी साठल्यानं झोपेच्या दरम्यान त्यांचा श्वास कोंडतो.

3. जनुकशास्त्र आणि वय :स्लीप एपनियामध्ये आनुवंशिकता देखील महत्वाची भूमिका बजावते. OSA चा कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींना हा आजर होण्याची शक्यता जास्त असते. कारण त्यांच्या घशातील संकुचित ऊती जन्मताच कमी असते. त्यामुळं अशा लोकांना याचा जास्त धोका असतो. याव्यतिरिक्त, लोकांच्या वयानुसार या आजाराचा प्रभाव अधिक वाढलेला दिसून येतो. विशेषत: वृद्ध पुरुषांना स्त्रियांपेक्षा OSA चा (स्लीप एपनिया) धोका जास्त असतो.

4. धूम्रपान आणि दारू :धूम्रपान आणि दारू पिल्यामुळं स्लीप एपनिया आजार वाढू शकतो. धुम्रपानामुळं वरच्या श्वासनलिकेमध्ये जळजळ होते. तसंच तिथं द्रव टिकून राहतं, ज्यामुळं झोपेत अडथळा येतो. अल्कोहोल घशातील स्नायूंना शिथिल करतं. त्यामुळं एपनियाची तीव्रता वाढू शकते. त्याचप्रमाणे, औषधांचा वापर देखील एपनियाला कारणीभूत ठरू शकते.

सेंट्रल स्लीप ॲप्निया (CSA) ची कारणे : OSA च्या विपरीत, सेंट्रल स्लीप ॲप्निया शारीरिक अडथळ्यांमुळं उद्भवतो. मज्जासंस्थेच्या श्वासोच्छवासाचं नियमन करण्याचं काम CSA चं असतं. या प्रकारात मेंदू श्वास घेण्यास जबाबदार असलेल्या स्नायूंना सिग्नल पाठवणे तात्पुरतं थांबवतो. त्यामुळं सेंट्रल स्लीप ॲप्निया होतो:

1. न्यूरोलॉजिकल घटक :पार्किन्सन रोग, स्ट्रोक किंवा ब्रेनस्टेम इजा यासारखे मज्जासंस्थेचे विकार श्वसनाच्या स्नायूंना योग्य सिग्नल पाठवण्याच्या मेंदूच्या क्षमतेमध्ये व्यत्यय आणू शकतात. त्यामुळं सेंट्रल स्लीप ॲप्निया होण्याची शक्यता जास्त असते.

2. हृदय :कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर हे त्यामुळं सेंट्रल स्लीप ॲप्नियाचं महत्त्वपूर्ण कारण आहे. हृदयाची विफलता असलेल्या रुग्णांमध्ये, फुफ्फुसांमध्ये द्रव जमा होऊ शकतं, ज्यामुळं झोपेच्या वेळी श्वास घेण्यास त्रास होतो. याव्यतिरिक्त, हृदयाच्या विफलतेमुळं रक्तातील कार्बन डाय ऑक्साईड पातळी नियंत्रित करण्याच्या शरीराच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळं श्वासोच्छवासाच्या अनियमित पद्धतीमुळं CSA होतो.

3. उंचीवर ऑक्सिजन घेण्यात अथळा :काही व्यक्तींना उंचीवर ऑक्सिजन घेण्यात अथळा यतो. त्यामुळं शरीराची श्वसन नियंत्रण केंद्रं कमी ऑक्सिजन पातळीमुळं गोंधळून जातात. परिणामी श्वासोच्छवासाचं घेण्यास व्यत्यय योतो.

स्लीप एपनियाचा आरोग्यावर होणारा परिणाम : स्लीप एपनियाचे आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात. श्वासोच्छवासात वारंवार होणारे व्यत्यय शरीर आणि मेंदूला पुरेसा ऑक्सिजन पाठवू शकत नाही. ज्यामुळं दिवसा थकवा येतो, एकाग्रता कमी होणे, अशी लक्षणे दिसतात. स्लीप एपनियाचा उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेहाशी देखील संबंध आहे. त्यामुळं वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे.

स्लीप एपनियाचे उपचार :स्लीप एपनियाचा उपचार हे रुग्णाच्या स्थितीवर अवलंबून असतात. सौम्य लक्षण जीवनशैलीत बदल केल्यामुळं कमी होऊ शकतात. वजन कमी करणे, धूम्रपान सोडणे, झोपण्यापूर्वी अल्कोहोल टाळल्यामुळं स्लीप एपनियाचा उपचार होऊ शकतो.

1. कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर (CPAP) थेरपी : OSA साठी सर्वात प्रभावी उपचार म्हणजे CPAP थेरपी.

2. सर्जिकल पर्याय : काही प्रकरणांमध्ये, घशातील अतिरिक्त ऊतक काढून टाकण्यासाठी, टॉन्सिलचा आकार कमी करण्यासाठी किंवा वायुमार्गातील संरचनात्मक समस्या सुधारण्यासाठी शस्त्रक्रियेची शिफारस केली जाऊ शकते.

3. उपकरणे आणि औषधे : श्वासनलिका उघडी ठेवण्यासाठी डिझाइन केलेली तोंडी उपकरणे किंवा CSA च्या मूळ कारणांवर उपचार करण्यासाठी औषधे देखील लिहून दिली जाऊ शकतात.

या सामान्य परंतु गंभीर विकाराचं निदान आणि उपचार करण्यासाठी स्लीप एपनियाची वैज्ञानिक कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे. याचं मूळ कारण वायुमार्गाच्या शारीरिक संरचनेत असो किंवा मेंदूच्या सिग्नलिंग सिस्टममध्ये असो, स्लीप एपनियाकडं दुर्लक्ष करून चालणार नाही.

हे वाचलंत का :

  1. Apple iPhone 16 मालिकासह AirPods, स्मार्टवॉच लॉन्च - Apple AirPods 4 launched
  2. AI पॉवर आणि दमदार फीचर्ससह नवीन iPhones लॉन्च, जाणून घ्या किंमत - Apple iPhone 16 Launched

ABOUT THE AUTHOR

...view details