छत्रपती संभाजीनगर Prakash Ambedkar: पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे यांना गरज पडल्यास सर्वप्रथम मी पुढे येईल, असं विधान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं. त्यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी सूचक वक्तव्य केलं असून उद्धव ठाकरे मुस्लिम मत मिळवण्यासाठी कॉंग्रेसबरोबर गेले, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. निवडणूक झाली की उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, असा दावा देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसंच कोल्हापूरची गादी वैचारिक असल्यानं पाठिंबा दिला, मात्र सातारा येथील गादी महाराजांशी संबंधित आहे, मात्र ते राजकीय असून भाजपासोबत आहेत. त्यांनीच गादीचा अवमान केलाय, त्यामुळं त्यांना पाठिंबा दिला नाही, असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
ठाकरे भाजपासोबत जातील :शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार धर्मवादी राहीले नसून धर्मनिरपेक्ष झाले आहेत. रश्मी ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली होती. कल्याण येथे श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटानं कुमकुवत उमेदवार दिला. त्यामुळंच उद्याच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट भाजपा एकत्र येऊ शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुस्लिमांनी ठाकरे गटापासून सावध रहावं, असा सल्लाही आंबेडकर यांनी दिला. कॉंग्रेस, एमआयएम, ठाकरे गट यांना मुस्लिमांच्या मतांची गरज आहे. त्यामुळं त्यांचा हा एककलमी कार्यक्रम असल्याचाही आंबेडकर म्हणाले. त्याच बरोबर निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. युवकांमध्ये सरकार विरोधी नैराश्य पसरलं आहे. जालना लोकसभा मतदारसंघातील वंचितचं उमेदवार देवगन यांच्या प्रचारासभेसाठी प्रकाश आंबेडकर फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोल्हापूरच्या गादीला पाठिंबा :कोल्हापूरच्या गादीला पाठींबा दिला कारण आमची वैचारीक बैठक आहे. शरद पवार यांनी मागे शाहू महाराजांचा पराभव केला होता, त्यामुळंच आम्ही शाहू महाराजांना पाठींबा दिला. छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहेत, मात्र सातारा गादी सांभाळणारे राजकारणात आहे. ज्यांनी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक वैदीक पद्धतीनं करायला विरोध केला, त्यांचं लोकांबरोबर सातारा गादीचे वंशज राजकारण करत आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.