"विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यात अपयश येत असेल तर त्यांचा पगार.." दीपक केसरकरांनी शिक्षकांबद्दल केलं मोठ वक्तव्य - DEEPAK KESARKAR NEWS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 27, 2024, 1:44 PM IST
शिर्डी (अहिल्यानगर) - "कोकणात उद्योग येण्याला आपला विरोध नाही. मात्र, कोकणातील बागायती क्षेत्राची आणि मासेमारी उद्योगाची हानी न करणाऱ्या उद्योगांची गरज आहे. ही आपली भूमिका कायम आहे", असे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला आहे. उद्योगमंत्री असताना उदय सामंत जगभर फिरत असल्यानं त्यांना जगाचा अनुभव आहे. त्यात उपरोधीकपणा काहीच नसल्याची सावरासावर दीपक केसरकर यांनी करत वादावर पडदा टाकला.
माजी मंत्री दीपक केसरकर यांनी 26 डिसेंबर रोजी शिर्डीत येत साईबाबांच्या धुपाआरतीला हजेरी लावलीय. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना केसरकर म्हणाले, " मंत्री केले नाही म्हणून मी नाराज नाही. कोकण आणि मतदारसंघाच्या विकासासाठी लक्ष केंद्रीत केलं आहे. आपण शालेय शिक्षण मंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मुंबईत मराठी भवन निर्माण करण्याचा निर्णय घेतला . आपण घेतलेले निर्णय पुढे नेण्याबाबतची भूमिका नवीन शिक्षण मंत्री ठरवतील. मात्र, केरळच्या धर्तीवर मुलांमध्ये स्कील डेव्हलपमेंट प्रोग्रॅम राबवण्याची गरज आहे," असे केसरकर यांनी सांगितले. "शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यात अपयशी ठरत असेल तर त्यांचा पन्नास टक्के पगार कमी करावा," अशी अपेक्षा केसरकरांनी व्यक्त केली.