हैदराबाद : जगातील पहिला ट्रिपल फोल्ड फोन लॉंच होण्यासाठी सज्ज आहे. कंपनीच्या या फोनचं नाव Huawei Mate XT असेल. सप्टेंबर 2024 मध्ये लाँच झालेला हा फोन सध्या फक्त चीनमध्ये उपलब्ध आहे. आता फोन 18 फेब्रुवारी रोजी जागतिक बाजारपेठेत लाँच होणार आहे. आतापर्यंत Huawei ही ट्रिपल-फोल्ड फोन लाँच करणारी जगातील एकमेव कंपनी आहे.
18 फेब्रुवारीला जागतिक लाँच
आज सकाळी, हुआवेईनं त्यांच्या अधिकृत एक्स पेजवर एक नवीन पोस्ट केलीय. टीझरमध्ये 18 फेब्रुवारी रोजी क्वालालंपूरमध्ये 'हुआवेई इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट लाँच' करणार असल्याचं म्हटलंय. Huawei Mate XT अलीकडेच TDRA प्रमाणन वेबसाइटवर दिसला होता. हा फोन तिथं GRL-LX9 मॉडेल नंबर म्हणून सूचीबद्ध झालाय. आता कंपनी 2025 मध्ये या फोनला जगातीक बाजारपेठेत लाँच करणार आहे.
Huawei Mate XT चा डिस्प्ले
या फोनमध्ये एक उत्तम OLED डिस्प्ले असेल. त्याचा स्क्रीन आकार 6.4 इंच असेल, परंतु उघडल्यावर तो मोठा होईळ. जेव्हा हा फोन अर्धा उघडला जाईल, तेव्हा त्याचा स्क्रीन आकार 7.9 इंच असणार आहे. फोन पूर्णपणे उघडल्यानंतर त्याची स्कीन 10.2 इंच होईल. फोनचा इतका मोठा डिस्प्ले असूनही, तो पूर्णपणे उघडल्यानंतर त्याची जाडी 3.6 मिमी राहते. त्यात Huawei चा Kirin 9010 5G चिपसेट देण्यात आला आहे.
कॅमेरा आणि बॅटरी
या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP चा प्राइमरी, 12MP चा अल्ट्रा-वाइड आणि 12MP चा टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी समोर 8MP चा कॅमेरा आहे. पॉवरसाठी, यात 5,600mAh ची बॅटरी आहे, जी 66W वायर्ड आणि 500W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की Mate XT मध्ये जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन बॅटरी आहे.
किंमत काय असू शकते?
चीनमध्ये, या फोनच्या बेस व्हेरिएंटची (16 जीबी रॅम + 256 जीबी) किंमत अंदाजे 2.42 लाख रुपये आहे, जी टॉप-एंड व्हेरिएंटसाठी अंदाजे 2.90 लाख रुपयपर्यंत जाते. जागतिक बाजारातही या किमतीच्या आसपास तो लाँच केला जाऊ शकतो. तथापि, कंपनीनं अद्याप याबद्दल काहीही सांगितलेलं नाही.
हे वाचलंत का :