नागपूर Team India Record at Nagpur : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेनंतर आता तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार असल्याचं दिसतंय. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. या मालिकेत टीम इंडिया आपली तयारी आणखी मजबूत करु इच्छिते. मालिकेतील पहिला सामना 06 फेब्रुवारी रोजी नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात खेळपट्टीची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे, या सामन्यापूर्वी येथील खेळपट्टी तसंच टीम इंडियाच्या या मैदानावरील रेकॉर्डवर एक नजर टाकूया.
📍 Nagpur
— BCCI (@BCCI) February 5, 2025
Gearing up for the #INDvENG ODI series opener..
..in Ro-Ko style 😎#TeamIndia | @IDFCFIRSTBank | @ImRo45 | @imVkohli pic.twitter.com/gR2An4tTk0
नागपूरच्या खेळपट्टी अहवाल : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावर आतापर्यंत एकूण 09 वनडे सामने खेळले गेले आहेत. या ठिकाणी एका वेळी 45,000 प्रेक्षक बसू शकतात. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवरील खेळपट्टी सामान्यतः फिरकी गोलंदाजांसाठी योग्य मानली जाते. तथापि, पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये या मैदानावरील तुटलेल्या खेळपट्टीवर उच्च धावसंख्येची स्पर्धा अपेक्षित आहे. मधल्या षटकांमध्ये चांगल्या धावा करणाऱ्या संघाला याचा फायदा होईल. नाणेफेक जिंकणारा संघ या विकेटवर लक्ष्याचा पाठलाग करु इच्छितो.
2019 मध्ये झाला होता शेवटचा वनडे : या मैदानावर शेवटचा वनडे सामना 2019 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियन संघाचा 9 धावांनी पराभव केला. त्या सामन्यात भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं. अशा परिस्थितीत, चाहत्यांना या सामन्यातही कोहलीकडून शानदार खेळीची अपेक्षा असेल. त्या सामन्यात विराट सामनावीर होता. या मैदानावर आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे. त्यानं या मैदानावर 5 डावात 81.25 च्या सरासरीनं आणि 105.17 च्या स्ट्राईक रेटनं 325 धावा केल्या आहेत.
Fielding Drills with a twist 😉
— BCCI (@BCCI) February 4, 2025
T Dilip, Axar Patel and Abhishek Sharma team up with our partners Campa Cola & Atomberg to give them a glimpse of #TeamIndia’s fielding drill and compete for the coveted fielding medal 🏅@akshar2026 | @IamAbhiSharma4 | @atomberg_tech pic.twitter.com/3HA7GqyCTg
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारताचा रेकॉर्ड :
5 मार्च 2019 : ऑस्ट्रेलियाचा 9 धावांनी पराभव.
1 ऑक्टोबर 2017 : ऑस्ट्रेलियाचा 7 विकेट्सनी पराभव.
30 ऑक्टोबर 2013 : ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव.
12 मार्च 2011 : दक्षिण आफ्रिकेकडून 3 विकेट्सनं पराभव.
18 डिसेंबर 2009 : श्रीलंकेकडून 3 विकेट्सनं पराभव.
28 ऑक्टोबर 2009 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध 99 धावांनी विजय.
भारतानं नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 6 वनडे सामने खेळले आहेत, त्यापैकी चार जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. भारतानं या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध उल्लेखनीय विजय मिळवले आहेत आणि दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्धही पराभव पत्करावा लागला आहे.
हेही वाचा :