ETV Bharat / state

मनमोहन सिंगांच्या पंतप्रधान पदाचा 'तो' कालखंड आधुनिक भारताचा सुवर्ण काळ - पृथ्वीराज चव्हाण - MANMOHAN SINGH DEATH NEWS

डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन वेदनादायी असल्याच्या शोक संवेदना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.

manmohan singh Death news
संग्रहित- पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2024, 9:56 AM IST

सातारा - डॉ . मनमोहन सिंग यांच्या काळात मनरेगा, माहिती अधिकार, खाद्यान्न सुरक्षा, भूमी अधिग्रहण, शिक्षण हक्क, यासारखे कायदे झाले. त्यामुळे हा दहा वर्षाचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्ण काळच म्हणावा लागेल, असं पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

जागतिक मंदीच्या काळात महत्त्वाची भूमिका- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले, " जागतिक मंदीच्या काळामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून भूमिका अत्यंत महत्वाची होती. त्यांनी देशाला आर्थिक मंदीची झळ बसू दिली नव्हती. त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होते. परंतु ते राजकारणी नव्हते".

अर्थतज्ज्ञ असल्याचा नव्हता गर्व- पृथ्वीराज चव्हाणांनी शोकसंदेशात म्हटलंय की, " डॉ. मनमोहन सिंग यांच्या सोबत मी पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री म्हणून 6 वर्षे काम केलं होतं. त्या काळात मी त्यांचा अत्यंत निकटवर्तीय होतो. ते उच्चशिक्षित आणि अर्थतज्ज्ञ होते. त्याचा त्यांना कधीही गर्व नव्हता. डॉ. मनमोहन सिंग यांना राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होतं. राजकारणात असूनही ते राजकारणी नव्हते, असं त्यांना म्हटलं जायचं. कारण ते परंपरागत मंत्री, पंतप्रधानांसारखे नव्हते. त्यांच्याकडे प्रचंड नम्रता होती. हे मी अगदी जवळून पाहिलं आहे".

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या आर्थिक उदारीकरणाचे श्रेय हे डॉ.मनमोहन सिंग यांना जाते-माजी खासदार, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील

अतिशय कुशल प्रशासक- श्रीनिवास पाटील यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं, " डॉ . मनमोहन सिंग हे 1991 ते 1996 या काळात केंद्रीय अर्थमंत्री होते. भारताची आर्थिक सुधारणा अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. 2004 ते 2014 या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांच्या कारकिर्दीत कराडचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. ते एक विद्वान, अतिशय कुशल प्रशासक होते. पण एक सहृदयी व्यक्तीदेखील होते. त्यांच्या निधनामुळे अर्थशास्त्र, राजकिय व सामाजिक क्षेत्रातील एक तत्त्वज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे".

हेही वाचा-

  1. मनमोहन सिंग यांच्या निधनानं राजकीय क्षेत्रातून दु:ख व्यक्त; पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्यासह शरद पवार यांनी काय म्हटलं?
  2. देशाला संकटातून बाहेर काढणारे अर्थमंत्री ते दोनवेळा पंतप्रधान; जाणून घ्या, मननमोहन सिंग यांची कारकिर्द
  3. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी होणार अंतिमसंस्कार, सात दिवसांचा देशात 'राष्ट्रीय दुखवटा'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.