ETV Bharat / state

सरपंच देशमुखांच्या खुनाचे आरोपी 18 दिवसानंतरही मोकाट; बीडचे नागरिक काढणार भव्य मोर्चा - BEED SURPANCH MURDER

सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटूनही तीन आरोपींना अटक झालेली नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आजपर्यंतची सविस्तर माहिती वाचा.

beed crime News Sarpanch Santosh Deshmukh  murder case P
संग्रहित- सरपंच संतोष देशमुख/बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 16 hours ago

बीड- सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडचा बिहार झाल्याची विरोधकाकंडून टीका होत आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असल्यानं बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुटत नसल्याचं चित्र निर्माण होत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आजपर्यंत काय घडलं? वाचा, सविस्तर माहिती.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मासाजोग हे गाव राज्य महामार्ग अहमदनगर-अहमदपूर रस्त्यावर येते. या गावात दळणवळणासाठी मुख्य रस्त्यावर असल्यामुळे कसलीही अडचण नाही. केज तालुका हा अगदी हाकेच्या अंतरावर आहे. अशा ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांनी गावाच्या विकासासाठी अनेक योजना आणून राबविल्या होत्या. त्यामुळे गावाच्या विकासात भरदेखील पडली. त्यामुळे संतोष देशमुख नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाऊ लागले. प्रत्येक व्यक्तीच्या अडीअडचणीत मदत करणारे म्हणून संतोष देशमुख यांना ओळखलं जात होतं.

तरुणाच्या नोकरीसाठी वाद- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मस्साजोग गावापासून अगदी एक किलोमीटर अंतरावर विंडमिल म्हणजे पवनचक्की बनवण्याचे स्टोअर रूम या ठिकाणी कंपनीनं तयार केले. या ठिकाणी काम करण्यासाठी याच भागातील तरुणांना संधी दिली जाते. त्यामुळे या गावातील काही सर्वसामान्य कुटुंबातील तरुण या ठिकाणी नोकरी करत होते. मात्र बाजूच्या असलेल्या डोणगाव या गावातील जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, विष्णू चाटे यांनी पवनचक्कीच्या गोडाऊन मालकाशी भेटून त्यांच्या गावातील तरुणांना संधी देण्याची मागणी केली. मात्र, मस्साजोग येथील तरुर अगोदर भरती केल्यामुळे या ठिकाणी जागा नव्हती. तर त्या ठिकाणी आमच्याच लोकांना संधी द्यावी, अशी देखील मागणी विष्णू चाटे यांनी पवनचक्की गोडाऊनच्या मालकाला केली. त्या ठिकाणी संतोष देशमुख यांचा विष्णू चाटे, जयराम चाटे, घुले आणि महेश केदार यांच्याबरोबर वादविवाद झाला.

संतोष देशमुख यांच्याबरोबर त्या दिवशी काय घडलं? दोन दिवसानंतर 9 डिसेंबर 2024 संतोष देशमुख हे केज येथील पोलीस ठाण्यात गेले. मात्र, पोलिसांनी तक्रार घेतली नाही. त्या ठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्या ठिकाणावरून संतोष देशमुख मस्साजोगकडे निघाले. त्यांचा केजवरूनच पाठलाग करण्यात आला. त्यांची गाडी टोल नाक्याजवळ अडवण्यात आली. त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली. गाडीतील संतोष देशमुख यांना ओढून विष्णू चाटे यांनी इतर साथीदारांनी त्यांना गाडीत घेऊन गेले. ही घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष देशमुख यांच्यासोबत त्यांचे चालक असलेले यांनी ताबडतोब येथे त्यांच्या लहान भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या भावाने ताबडतोब पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी त्या ठिकाणी टाळाटाळ केली. मात्र सहा वाजल्यानंतर सर्वच नागरिक घाबरलेले अवस्थेत होते. त्याच वेळेस संतोष देशमुख यांचा खून दैठणा या ठिकाणी झाला असल्याची माहिती मिळाल. त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी गेले. संतोष देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेतला. मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून जाणार नाही, अशी ग्रामस्थांनी मागणी केली.

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचा प्रकरणाशी काय संबंध- गेल्या तीन वर्षापासून पवनचक्की बसवण्याचं काम बीड जिल्ह्यात चालू झाले आहे. मात्र पवनचक्क्या बसवल्या जात असताना त्या भागातील धनदांडगे याचा फायदा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी असलेल्या पवनचक्की कर्मचारी यांच्यावर दबाव टाकून त्यांच्याकडून खंडणी वसुली केली जात असल्याची चर्चा अनेक वेळा झाली. या जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी पवनचक्क्या बसवण्यासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्या जमिनीचा मोबदलादेखील पवनचक्की बसवणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांना देत आहेत. मात्र, या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मीक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वाल्मीक कराड आणि काही जणांनी धमकविले असल्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग सापडले आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, खरोखरच वाल्मीक कराड यांनी पवनचक्की कर्मचाऱ्यांना धमकावून खंडणी मागितली आहे का? हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरपंचाच्या हत्येचा गाजला मुद्दा-पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. संतोष देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामस्थांनी अंतिमसंस्कार केले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचा निषेध बीड जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी केला. याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातदेखील उमटले आहेत. बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रश्नाला वाचा फोडली. त्यानंतर आमदार सुरेश धस आणि अनेक आमदारांनी या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना घेरले. संदीप क्षीरसागर, सुरेश धस, नमिता मुंदडा, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक आमदारांनी वाल्मीक कराड यांना अटक करा, अशी मागणी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लावून धरण्यात आली होती.

आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी-धनंजय मुंडे- मंत्री धनंजय मुंडे यांना नागपूर येथील पत्रकारांशी बोलताना वाल्मीक कराड हे निकटवर्तीय असल्याचे मान्य केले. त्यांच्यावर एसआयटी दाखल करायची असेल तर सरकारने करावी, असेही त्यांनी म्हटले. संतोष देशमुख खून प्रकरणात एसआयटी स्थापन करावी. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशीदेखील धनंजय मुंडे यांनी मागणी केली आहे. "या प्रकरणात विनाकारण मला गोवण्याचे काम केले जात आहे," असा दावा मुंडे यांनी केला.

  • 21 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष (एसपी) शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर अंजली दमानिया, सुरेश धस, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, मनोज जरांगे पाटील आणि प्रणिती शिंदे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.

हत्येला 18 दिवस उलटूनही आरोपी फरार- संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनाचा अहवालातील माहितीनुसार त्यांची अत्यंत निर्घृण हत्या झाल्याचं समोर आलं आहे. मस्साजोग प्रकरणात यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी 4 आरोपी फरार आहे आहेत. वाल्मीक कराड यांना अटक करा, अशी संतोष देशमुख यांचे नातेवाईक, विरोधकांसह ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीदेखील दाखल झाले आहेत. आता या प्रकरणात सीआयडी चौकशीत नेमकं काय उघड होतंय, हे सुद्धा पाहणं महत्त्वाच ठरणार आहे. उद्या 28 डिसेंबर रोजी बीडमध्ये भव्य मोर्चाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या मोर्चासाठी प्रमुख प्रतिनिधी म्हणून कोण येणार अजूनही गुलदस्त्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर बीडला आयपीएस अधिकारी नवनीत कावत यांच्याकडं पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी आलेली आहे. त्यांच्यापुढे जिल्ह्यातील गावगुंडगिरी आणि खंडणीबहाद्दरांना आळा बसविण्याचं आव्हान आहे.

हेही वाचा-

  1. "संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी"; पहिल्या दिवसापासून माझी मागणी, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
  2. बीड जिल्ह्यात 1281 पिस्तूल परवानाधारक; विनापरवाना पिस्तूल वापरणाऱ्या नागरिकांची संख्या किती?
  3. शरद पवार यांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट: मुलीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.