नाशिक Panchavati Express Coupling Break : मध्य रेल्वे मार्गावरील कसारा स्टेशनजवळ मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्याची घटना घडली. आज (6 जुलै) सकाळी घडलेल्या घटनेत एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्यानं इंजिन आणि एक बोगी पुढं मुंबईच्या दिशेनं निघून गेली. काही अंतरावर जाऊन इंजिन आणि बोगी थांबली. इंजिन आणि एक बोगी पुढं गेल्यानं प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. मात्र, सुदैवानं यादरम्यान कोणतीही जीवितहानी आणि दुखापत न झाल्यानं प्रवाशांनी निश्वास सोडला.
कसारा स्थानकाजवळ पंचवटी एक्स्प्रेसचं कपलिंग तुटलं, इंजिन डबे सोडून गेलं पुढं - Panchavati Express
Panchavati Express Coupling Break : मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचं कसारा स्टेशनजवळ अचानक कपलिंग तुटलं. त्यामुळं काही अंतरावर इंजिनचा एक डब्बा पुढं गेल्यानं एकच खळबळ उडाली.
कसारा स्थानकाजवळ पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटली (Source reporter)
Published : Jul 6, 2024, 10:20 AM IST
|Updated : Jul 6, 2024, 1:56 PM IST
Last Updated : Jul 6, 2024, 1:56 PM IST