ETV Bharat / health-and-lifestyle
सावधान! जेवल्यानंतर लगेच झोपणं पडेल महागात - BENEFITS OF WALKING AFTER DINNER
व्यस्ततेच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे एक ना अनेक आरोग्यविषयक समस्या उद्बवतात. परंतु जेवण झाल्यानंतर चालल्यास तुम्ही निरोगी राहू शकता.
Published : Oct 11, 2024, 1:41 PM IST
|Updated : Oct 11, 2024, 2:30 PM IST
Benefits Of Walking After Dinner: धावपळीच्या जीवनचक्रात अनेक लोकं आरोग्यकडं दुर्लक्ष करत आहेत. सकाळी ऑफिसला जाण्यासाठी कित्येक जण रात्रीचं जेवण आटोपून लगेच झोपतात. ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कारण, असं केल्यानं पचनक्रिया मंदावते. एवढेच नाही तर त्यामुळं वजन वाढतं. तसंच पोटासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यासाठी रात्री जेवण झालं की चालणं फार गरजेचं आहे. यामुळे रोग प्रतिकार शक्तीच नाही तर चांगली झोप सुद्धा येते. आयुर्देवानुसार जेवणानंतर किमान १०० पावलं चाललं पाहिजे. कारण शतपावलीनं रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रणात राहतं. सोबतच अन्न पचण्यास आणि चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊयात शतपावलीचे आरोग्यास होणारे फायदे.
- पचनासाठी उत्तम: आयुर्वेदानुसार अन्न ग्रहण केल्यानंतर थोडा वेळ शतपावली केल्यास पचनक्रिया सुरळीत होते. असं म्हटलं जाते की, जेवणानंतर चालल्यामुळे पचनक्रियेची प्रक्रिया गतिमान होते. त्यामुळं अन्न लवकर पचण्यास मदत होते. सोबतच बद्धकोष्ठता, पोटात सूज येणं आणि गॅस संबंधित समस्या कमी होतात.
- 2014 मध्ये जर्नल ऑफ न्यूट्रिशननं प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, असं आढळून आलं की, जेवल्यानंतर 10 मिनिटं चालल्यास पचनशक्तीमध्ये लक्षणीय वाढ होते. न्यूझीलंडच्या ओटागो युनिव्हर्सिटीच्या डॉ. एम. जे. सँड्स यांनी हा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, जे लोक जेवणानंतर नियमित चालतात त्यांची पचनक्रिया सुधारते शिवाय पोटासंबंधित अनेक आजारांपासून सुटका होते.
- हृदयाचं आरोग्य सुधारतं: जेवल्यानंतर थोडं चालण्यामुळं रक्ताभिसरण वाढवते. तज्ञांच्या मते, ते केवळ हृदय मजबूत होत नाही तर, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका देखील कमी होतो. तसंच जेवणानंतर चालल्यास रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत होते.
- वजन कमी करण्यास मदत: जेवणानंतर चालल्यास वजन कमी करण्यास मदत होते. कारण जेवल्यानंतर चालण्यानं जास्त कॅलरीज बर्न होतात. त्यामुळं वजन नियंत्रणात राहातं, असं तज्ञांचे म्हणणं आहे.
- मधुमेह कमी करण्यासाठी उपयुक्त: खाल्ल्यानंतर दहा मिनिटे चालल्यानं इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते, असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे.
- चांगली झोप: जेवणानंतर फेरफटका मारल्यानं तुमची सर्कॅडियन लय नियमित होते आणि चांगली झोप येते. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, चांगलल्यामुळं ताणतणाव दूर होतो. यामुळे शांत झोप येते शिवाय स्नायू आणि सांधे मजबूत होतात.
- तणाव कमी होतो: चालल्यामुळं आपलं शरीर एंडोर्फिन सोडतो. असं म्हटलं जातं की ते मूड सुधारतं आणि तणाव कमी करण्यास मदत करतं. याशिवाय जेवल्यानंतर थोडं चालणं चयापचय दर वाढण्यास मदत करतं.
संदर्भ
https://www.hcafloridahealthcare.com/healthy-living/blog/5-benefits-of-walking-after-eating
https://www.ncbi.nlm.nih.gov/search/research-news/17034/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
हेही वाचा