ETV Bharat / sports

27 सेकंदात ऋषभ पंतनं कमावले 270000000 रुपये... पाच मिनिटांपूर्वी झालेला विक्रम मोडत घडवला इतिहास

भारतीय संघाचा स्टार युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला आयपीएल 2025 साठी एका संघानं मोठ्या रकमेत विकत घेतलं आहे. गेल्या काही वर्षांपासून पंत चांगलाच फॉर्मात आहे.

Rishabh Pant Most Expensive Player in IPL History
ऋषभ पंत (ETV Bharat Graphics)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : 2 hours ago

जेद्दाह Rishabh Pant Most Expensive Player in IPL History : आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव सुरु आहे. सुरुवातीला 12 मार्की खेळाडूंवर बोली लावण्यात आली. यावेळी मार्की खेळाडूंच्या यादीत सात भारतीय आणि पाच परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू क्रिकेट जगतात खूप लोकप्रिय आहेत, त्यांनी गेल्या काही वर्षांत T20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

पंतनं रचला इतिहास : सर्वांच्या नजरा ऋषभ पंतवर खिळल्या होत्या. पंतला लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघानं सोडलं होतं. त्याच्यावर मोठी बोली लावली जाणार हे निश्चित होतं आणि नेमकं तेच झालं. लखनऊ सुपर जायंट्स संघानं पंतला तब्बल 27 कोटी रुपयांत खरेदी केलं. 2016 नंतर पंत पहिल्यांदाच दिल्लीशिवाय अन्य संघाकडून खेळताना दिसणार आहे. पंत अलीकडं उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या वर्षी कार अपघातानंतर परतल्यानंतर त्यानं खूप धावा केल्या. लखनऊचा संघ त्याला कर्णधार बनवू शकतो.

अय्यरला टाकलं मागे : यासह पंत आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक किंमतीला विकला जाणारा खेळाडू बनला आहे. यात, त्यानं श्रेयस अय्यरला मागं सोडलं आहे, जो थोड्याच वेळापूर्वी 26.75 कोटी रुपयांना विकला गेला होता. ऋषभ पंतसाठी लखनऊ आणि आरसीबी यांच्यात सुरुवातीला युद्ध रंगलं होतं. पंत 2 कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता आणि अल्पावधीतच त्याची किंमत 10 कोटींच्या पुढं गेली होती. यादरम्यान हैदराबादही शर्यतीत सामील झाला, पण लखनऊनंही हार मानली नाही.

लखनऊनं केलं खरेदी : हैदराबादची मालक काव्या मारन आणि लखनऊचे मालक संजय गोयंका यांनी पंतसाठी लिलावाच्या टेबलावर बोली लावली आणि काही वेळातच त्याची किंमत 17 कोटींच्या पुढं गेली. हैदराबाद आणि लखनऊ इथंच थांबले नाहीत आणि पंतवरील बोली वाढतच गेली. लखनऊनं पंतसाठी 20.75 कोटी रुपयांची बोली लावली आणि हैदराबादनं माघार घेतली. मात्र, दिल्लीनं आरटीएमचा वापर केला. यानंतर लखनऊनं पंतसाठी 27 कोटींची ऑफर दिली आणि दिल्लीनं हात मागे घेतला. अशाप्रकारे पंत 27 कोटी रुपयांना विकला गेला आणि लखनऊनं त्याला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू म्हणून खरेदी केलं.

पंतची आयपीएल कारकिर्द कशी : पंतनं 2016 पासून त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत दिल्ली कॅपिटल्सचं (डीसी) प्रतिनिधित्व केलं आहे. या काळात त्यानं दिल्लीसाठी 110 सामन्यांमध्ये 35.31 च्या सरासरीनं एक शतक आणि 18 अर्धशतकांसह 3,284 धावा केल्या आहेत. त्याला 2021 मध्ये संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि त्याच हंगामात त्यानं आपल्या संघाला प्लेऑफमध्ये नेलं होतं.

हेही वाचा :

  1. AUS vs IND 1st Test: यशस्वीनं केला ऐतिहासिक पराक्रम, जगात फक्त 2 फलंदाजांनी केला 'हा' कारनामा
  2. 534... भारतानं ऑस्ट्रेलियाला दिलं 'हिमालया'इतकं लक्ष्य; 147 वर्षात असं घडलंच नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.