लाहोर AFG vs ENG 8th Match Live : चॅम्पियन्स ट्रॉफीचा आठवा सामना इंग्लंड आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघात लाहोरमध्ये सुरु आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना करा किंवा मरो असा आहे. याचा अर्थ असा की यात पराभूत होणाऱ्या संघाला घरी जाण्याचं तिकीट मिळेल आणि हा सामना जिंकणारा संघ स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवेल. इंग्लंड आणि अफगाणिस्तान दोघांनीही त्यांचे पहिले सामने गमावले आहेत. इंग्लंडचा ऑस्ट्रेलियानं पराभव केला, तर अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेनं पराभव केला होता.
Second 150+ score in the #ChampionsTrophy and it's Afghanistan's Ibrahim Zadran punching it 👊#AFGvENG ✍️: https://t.co/6IQekpiozs pic.twitter.com/E0Jurd7p0h
— ICC (@ICC) February 26, 2025
अफगाणिस्तानची प्रथम फलंदाजी : या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जास्त फायदेशीर राहिला नाही, कारण डावाच्या पाचव्याच षटाकत आर्चरनं पहिल्या चेंडूवर रहमानुल्ला गुरबाज (6) आणि पाचव्या चेंडूवर सेदिकुल्ला अटलला (4) बाद करत अफगाणिस्तानला दोन धक्के दिले आहेत. इतक्यावरच न थांबता त्यानं नवव्या षटकात रहमत शाहला (4) बाद करत तिसरा धक्का दिला. मात्र यानंतर इब्राहिम झद्रान आणि हसमतुल्ला शाहिदी यांनी शतकी भागीदारी झाली. परंतु 30व्या षटकात आदिल रशीदनं शाहिदीला बाद करत ही भागीदारी तोडली. यादरम्यान इब्राहिम झद्राननं शतक झळकावलं असून त्याचं वनडे क्रिकेटमधील सहावं शतक ठरलं, तसंच चॅम्पियन्स ट्रॉफीत शतक करणारा तो पहिलाच अफगाण खेळाडू ठरला आहे. अफगाणिस्ताननं आपल्या निर्धारित 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 325 धावा केल्या आहेत.
Ibrahim Zadran rises to the occasion with a crucial ton in a must-win game against England 💯#ChampionsTrophy #AFGvENG ✍️: https://t.co/6IQekpiWp0 pic.twitter.com/vqUZvIe6Hx
— ICC (@ICC) February 26, 2025
पहिल्या सामन्यात दोन्ही संघात पराभव : इंग्लंड आणि अफगाणिस्तानला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळं हा सामना दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' असा झाला आहे. ग्रुप बी मध्ये, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियानं त्यांचे पहिले सामने जिंकले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडचं वर्चस्व आता भूतकाळात जमा झालं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध, जर त्यांच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, तर त्यांच्या गोलंदाजांनी निराशा केली कारण त्यांना 350 पेक्षा जास्त धावसंख्येचा बचाव करता आला नाही.
5️⃣0️⃣ Strong & Counting! 👏@IZadran18 unlocks the milestone of 50 sixes in International cricket. 👍#AfghanAtalan | #ChampionsTrophy | #AFGvENG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/Y5HbuWxo9c
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) February 26, 2025
हेड-टू-हेड रेकॉर्ड : या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, अफगाणिस्तान आणि इंग्लंड वनडे स्वरुपात फक्त तीन वेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यापैकी इंग्लंडनं दोनदा विजय मिळवला आहे. तर अफगाणिस्ताननं एकदा विजय मिळवला आहे. आतापर्यंत, या फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांमध्ये नेहमीच रोमांचक सामना पाहायला मिळाला आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना या सामन्यातही एका रोमांचक सामन्याची अपेक्षा असेल.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 :
अफगाणिस्तान : रहमानुल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, हसमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अझमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद, फजलहक फारुकी.
इंग्लंड : बेन डकेट, फिल साल्ट, जेमी स्मिथ, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड, जेमी ओव्हरटन.
हेही वाचा :