ETV Bharat / sports

AFG vs ENG सामन्यात इब्राहिम झद्राननं केला विश्वविक्रम... 4 तासांत लिहिलं नवं 'रेकॉर्ड बुक' - CHAMPIONS TROPHY 2025

AFG vs ENG सामन्यात, अफगाण फलंदाजानं तुफानी शतक ठोकून एक नवा इतिहास रचला आहे. त्यानं बेन डकेटचा विश्वविक्रम मोडला आहे.

Highest Individual Score in Champions Trophy
इब्राहिम झद्रान (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 26, 2025, 6:40 PM IST

Updated : Feb 26, 2025, 6:58 PM IST

लाहोर Highest Individual Score in Champions Trophy : अफगाणिस्तानचा युवा सलामीवीर इब्राहिम झद्राननं इंग्लंडविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात ऐतिहासिक शतक झळकावलं आहे. संघाचा सलामीवीर झद्राननं या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वयक्तिक धावा केल्या आहेत. त्यानं इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटचा विक्रम मोडित काढला आहे. तसंच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शतक करणारा तो पहिला अफगाणिस्तानी फलंदाज ठरला आहे. लाहोरमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं सुरुवातीला तीन विकेट गमावल्यानंतर, 23 वर्षीय तरुण सलामीवीर झद्राननं डावाची सूत्रं हाती घेतली आणि नंतर वेग वाढवत शानदार शतक ठोकलं. इब्राहिमनं त्याच्या वनडे कारकिर्दीतील सहावं शतक झळकावलं आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानसाठी शतकाचं खातंही उघडलं. या सामन्यात इब्राहिम झद्रानच्या शतकाच्या बळावर अफगाणिस्ताननं 325 धावंचा डोंगर उभारला आहे, आता इंग्लंडला आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी 326 धावांचा मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.

शानदार शतकी खेळी : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठव्या सामन्यात इंग्लंडचा सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर अफगाणिस्तानशी झाला. ग्रुप बी मधील हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता कारण दोघांनाही त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. अशा परिस्थितीत विजय आवश्यक होता आणि अशा वेळी अफगाणिस्तानच्या या प्रतिभावान फलंदाजानं प्रथम आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि नंतर हे शानदार शतक झळकावून आणखी एक कामगिरी आपल्या नावावर केली.

झद्राननं केला विश्वविक्रम : झद्राननं 106 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आणि अशा प्रकारे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज बनला. त्यानं 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं त्याच्या वनडे कारकिर्दीतील सहावं शतक झळकावलं. यासह, तो वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा पहिला अफगाणिस्तानी फलंदाज बनला. शतक पूर्ण केल्यानंतर काही वेळातच, अफगाण फलंदाजानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बेन डकेटचा सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम मोडला. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात डकेटनं इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 165 धावांची खेळी केली. काही दिवसांनंतर, झद्राननं 177 धावांचा टप्पा गाठून एक विश्वविक्रम रचला.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या :

  • 177 - इब्राहिम झद्रान विरुद्ध इंग्लंड, लाहोर (2025)
  • 165 - बेन डकेट विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाहोर (2025)
  • 145* - नॅथन अ‍ॅस्टल विरुद्ध अमेरिका द ओव्हल (2004)

झद्रान अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला. अफगाणिस्तानसाठी वनडे सामन्यात सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम आधीच झद्रानच्या नावावर नोंदवला गेला होता. पण आज इंग्लंडविरुद्ध 177 धावा करुन त्यानं आपलाच जुना विक्रम मोडला आहे.

अफगाणिस्तानसाठी वनडे सामन्यात सर्वात मोठी खेळी :

  • 177 धावा - इब्राहिम झदरान, विरुद्ध इंग्लंड, लाहोर, 2025
  • 162 धावा - इब्राहिम झद्रान, विरुद्ध श्रीलंका, पल्लेकेले, 2022
  • 151 धावा - रहमानउल्लाह गुरबाज, विरुद्ध पाकिस्तान, हंबनटोटा, 2023
  • 149* धावा - अझमत उमरझाई, विरुद्ध श्रीलंका, पल्लेकेले, 2024
  • 145 धावा - रहमानुल्ला गुरबाज, विरुद्ध बांगलादेश, चितगाव, 2023

आयसीसी वनडे स्पर्धेत एका डावात 150+ धावा करणारे सर्वात तरुण फलंदाज :

  • 23 वर्षे 76 दिवस - इब्राहिम झदरान, विरुद्ध इंग्लंड, लाहोर, 2025
  • 24 वर्षे 163 दिवस - कपिल देव, विरुद्ध झिम्बाब्वे, ट्यूनब्रिज वेल्स - 1983
  • 25 वर्षे 95 दिवस - इम्रान नझीर, विरुद्ध झिम्बाब्वे, किंग्स्टन, 2007
  • 26 वर्षे 322 दिवस - सौरव गांगुली, विरुद्ध श्रीलंका, टॉन्टन, 1999
  • 28 वर्षे 12 दिवस - ग्लेन टर्नर, विरुद्ध East आफ्रिका, बर्मिंगहॅम, 1975

आयसीसी वनडे स्पर्धेत आशियाई फलंदाजानं केलेली सर्वोच्च धावसंख्या :

  • 183 धावा - सौरव गांगुली, विरुद्ध श्रीलंका, टॉन्टन, 1999

  • 175* धावा - कपिल देव, विरुद्ध झिम्बाब्वे, ट्यूनब्रिज वेल्स - 1983
  • 175 धावा - वीरेंद्र सेहवाग, विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, 2011
  • 161* धावा - तिलकरत्ने दिलशान, विरुद्ध बांगलादेश, मेलबर्न, 2015

हेही वाचा :

  1. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या मोबाईलमध्ये कोणते वॉलपेपर? स्वतःचं दिली मजेशीर प्रश्नांची उत्तरं
  2. साहेबांना पराभूत करत अफगाण संघ दुसऱ्यांदा धक्का देणार? AFG vs ENG मॅच 'इथं' पाहा लाईव्ह

Last Updated : Feb 26, 2025, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.