ETV Bharat / state

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; कारण काय?

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.

All party meeting today on 24 november 2024 ahead of winter session of Parliament
25 नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी (Winter Session of Parliament) सत्ताधाऱ्यांनी रविवारी (24 नोव्हेंबर) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. ही बैठक संसद भवन संलग्नीकरणाच्या मुख्य समिती कक्षात होणार आहे.

बैठकीचं कारण काय? : संसदेचं हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. सरकारी कामकाजाच्या अत्यावश्यकतेच्या अधीन राहून, अधिवेशन 20 डिसेंबर रोजी संपणार आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरळीत चालावं, यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचं सांगितलं जातंय. यामध्ये विरोधकांनी मांडलेल्या मागण्यांवर अधिवेशनात चर्चा होणार आहे. तसंच केंद्र सरकार या अधिवेशनात सादर करण्यात येणाऱ्या विधेयकांची माहितीही विरोधकांना देणार आहे. याशिवाय हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी विरोधी पक्षांकडून सहकार्याचं आवाहनही केंद्र सरकार करणार आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयकावरुन गदारोळ होण्याची शक्यता : सध्या वक्फ दुरुस्ती विधेयक सभागृहाच्या संयुक्त समितीकडं आहे. अशास्थितीत सरकार हिवाळी अधिवेशनात (Winter Session 2024) वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याची दाट शक्यता आहे. संसदेच्या या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. अशा स्थितीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनातील सर्वात महत्त्वाचे विधेयक वक्फ दुरुस्ती विधेयक असेल. यासंदर्भात संसदीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. या अहवालावर सभागृहात चर्चा होणार आहे. यावेळी संसदेत एक देश, एक निवडणूक यावरही चर्चा होणार आहे. विरोधकांच्या विरोधामुळं यावरही गदारोळ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. वक्फ विधेयकावर JPC बैठकीत TMC खासदाराने काचेची बाटली अध्यक्षांवर भिरकावली, एक दिवसाकरता निलंबित
  2. वक्फ सुधारणा विधेयकाला प्रखर विरोधाबरोबरच समर्थनाचीही धार, सोशल मीडियावर धुमाकूळ - Waqf Amendment Bill
  3. वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात सुन्नी मुस्लिम संघटनेतर्फे संयुक्त समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांना निवेदन सादर - Waqf Amendment Bill

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.