ETV Bharat / politics

भाई, भाऊ की दादा? मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्ली दरबारी, 'स्टाइक रेट'मुळं राष्ट्रवादी आग्रही - AJIT PAWAR CHIEF MINISTER POST

विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं.

AJIT PAWAR CHIEF MINISTER POST
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2024, 4:53 PM IST

Updated : Nov 24, 2024, 9:27 PM IST

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून, महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. विजयानंतर महायुतीत आता मुख्यमंत्रिपदाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधी सोहळा कधी होणार? कोणत्या पक्षाचे किती मंत्री असतील? मुख्यमंत्र्यांसोबत कोण-कोण शपथ घेणार? किती उपमुख्यमंत्री असतील? अशा अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू आहे.

पद एक आग्रही तिघे : भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांनी एकत्र येत महायुती स्थापन केली आणि विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक 132, शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल? याबाबत जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. प्रत्येक आमदार, कार्यकर्त्याला आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं असतं. त्यामुळं महायुतीतील तीनही पक्षाचे नेते हे आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी आग्रही आहेत.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज (24 नोव्हेंबर) मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया दिली. "महायुतीतील तीनही पक्ष एकत्र बसून मुख्यमंत्री कोण होणार? याचा निर्णय घेतील. अजित पवारांचा स्ट्राइक रेट खूप चांगला आहे, तेही मुख्यमंत्री होऊ शकतात," असं विधान छगन भुजबळ यांनी केलं.

गिरीश महाजन काय म्हणाले? : "देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत ही आमची आणि भाजपाच्या सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं सर्वांना वाटत असतं. भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं भाजपाचाच मुख्यमंत्री व्हावा आणि तेही देवेंद्र फडणवीसच व्हावेत, असं आम्हाला वाटतं. शेवटी याचा निर्णय दिल्तीतील आमचे वरिष्ठ नेते घेतील व तो निर्णय आम्हाला मान्य असेल," असं भाजपा नेते गिरीश महाजन म्हणाले.

दीपक केसरकर काय म्हणाले? : "ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडली. फार चांगला निकाल आला आहे. त्यामुळं शिवसेनेच्या वतीनं तर आम्ही नेहमीच विचार करतो की, एकनाथ शिंदेंना पहिलं प्राधान्य द्यायला हवं. तसंच, आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर जेवढे प्रेम करतो, तेवढंच प्रेम आणि विश्वास आमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आहे," असं केसरकर म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाबाबतचा निकाल केंद्राच्या कोर्टात : मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. "राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? याचा निर्णय सत्ताधारी महायुतीचे नेते आणि भाजपाचं संसदीय मंडळ घेईल. जो निर्णय होईल तो राज्याच्या आणि महायुतीच्या हिताचा असेल," असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतचा निकाल केंद्राच्या कोर्टात टाकलाय.

मुख्यमंत्रिपद कोणाच्या वाट्याला? : विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यात मुख्यमंत्रिपद शिवसेना, भाजपा की राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

महाविकास आघाडीचा दारुण पराभव : राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. यात भाजपाला 132 जागा, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला एकूण 46 जागा मिळाल्या. काँग्रेसला 16, उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार) 10 जागा जिंकता आल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचा

  1. विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवारांची निवड, तर अनिल पाटील यांची प्रतोदपदी निवड
  2. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याविना चालणार सभागृह? जाणून घ्या कारण...
  3. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीकडून महाविकास आघाडीला धोबीपछाड, 10 पैकी 9 जागांवर विजय

Last Updated : Nov 24, 2024, 9:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.