मुंबई - बॉलिवूड पार्श्वगायक उदित नारायण यांनी त्यांच्या महिला फॅनला किस केल्याचा वाद अद्याप संपलेला नाही. त्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उदित नारायण हे दोन दिग्गज बॉलिवूड महिला गायिका यांना अचानक किस करताना दिसत आहे. ही अचानक गोष्ट घडल्यामुळे या दोन्ही गायिकांना धक्का बसला होता. आता या दोन महिला गायिका कोण आहेत, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
उदित नारायण यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर : उदित नारायण यांनी बॉलिवूड गायिका श्रेया घोषाल आणि अलका याज्ञिक यांना सार्वजनिकरित्या किस केलं होतं. आता हा जुना व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकजण संतापले आहेत. उदित नायरायण यांच्या या कृतीमुळे अनेकजण त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये श्रेया घोषालच्या हावभावांवरून हे स्पष्ट दिसत आहे, तिला हे अजिबात अपेक्षित नव्हते. या कृत्यामुळे श्रेयाला धक्का पोहचला होता. यानंतर उदित नायरायण यांनी अलका याज्ञिकला देखील किस केली होती, या गोष्टीचा त्यांना देखील धक्का बसला होता.
Lol😭
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 31, 2025
pic.twitter.com/bIVc4VJr2d
उदित नारायण पुन्हा एकदा झाले ट्रोल : उदित नारायणचा हा व्हिडिओ व्हायरल होताच लोक त्यांना पुन्हा एकदा ट्रोल करत आहेत. या व्हिडिओवर देखील अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही चाहत्यांनी उदित नारायण यांना चांगलचं फटकारलं आहे. एका यूजरनं या व्हिडिओवर लिहिलं, 'उदित नारायण हाश्मी.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'ठरकी नारायण.' तिसऱ्या यूजरनं लिहिलं, 'त्याला ट्रेंडमध्ये कसे राहायचे हे माहित आहे.' याशिवाय आणखी एकानं लिहिलं 'आपण काळाबरोबर चालत आहोत!' या व्हिडिओवर भरभरून कमेंट्स येत आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायक उदित नारायण हे सध्या सतत चर्चेत आहेत. अलीकडे एका कार्यक्रमात त्यांनी काही महिला फॅनला किस केलं होतं. यानंतर त्यांच्यावर अनेकजण भडकले होते. त्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी उदित नारायण यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं.