ETV Bharat / technology

Honor X9c 5G लवकरच होणार लाँच, 108MP कॅमेरा आणि 6600mAh बॅटरीनं सुसज्ज, अ‍ॅमेझॉनवर लँडिंग पेज लाईव्ह - HONOR X9C 5G LAUNCH DATE

Honor X9c 5G : Honor 15 फेब्रुवारी रोजी नवीन फोन Honor X9c 5G लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनचं ॲमेझॉनवर लाईव्ह करण्यात आला आहे.

Honor X9c 5G
Honor X9c 5G (Honor)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 3, 2025, 12:40 PM IST

हैदराबाद : टेक जायंट Honor भारतीय बाजारात आपला नवीन फोन आणण्याच्या तयारीत आहे. या फोनचे नाव Honor X9c 5G आहे. कंपनीनं या फोनच्या लाँचची पुष्टी केली आहे. त्याचं लँडिंग पेज Amazon वर लाईव्ह झालं आहे. पेजवर डिव्हाइसचं नाव नसलं तरी, टीझर इमेजवरून असं दिसून येते की कंपनी या महिन्यात Honor X9c 5G लाँच करणार आहे, हा फो गेल्या वर्षी लॉंच झालेल्या Honor X9b 5G ची आवृत्ती असेल. सप्टेंबर २०२४ मध्ये, ऑनरनं भारतात ऑनर २०० लाईटचं अनावरण केलं होतं. तेव्हापासून कंपनीनं भारतीय बाजारात कोणताही नवीन फोन लाँच केलेला नाही. तथापि, आजपासून कंपनीनं त्यांच्या नवीन डिव्हाइस, Honor X9c 5G च्या आगमनाची टीझ करण्यास सुरुवात केली आहे.

Honor X9c 5G लवकरच लाँच होणार
Honor X9c 5G च्या Amazon पेजवर उपलब्ध असलेल्या प्रतिमांवरून असं दिसून येते की त्यात OIS+EIS सक्षम मुख्य कॅमेरा आणि जलद चार्जिंग सपोर्टसह मोठी बॅटरी असेल. त्याची रचना नोव्हेंबर २०२४ मध्ये मलेशियामध्ये लाँच झालेल्या मागील Honor X9c 5G सारखीच दिसते. टिपस्टर पारस गुगलानी यांच्या मते, हा फोन १५ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतात अधिकृतपणे उपलब्ध होईल.

Honor X9c 5G: काय खास असेल?
मलेशियामध्ये, Honor X9c 5G दोन कॉन्फिगरेशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ज्यात 12GB+256GB आणि 12GB+512GB पर्यायांचा समावेश आहे. ब्रँडनं मलेशियामध्ये या फोनची किंमत ३३५$ आणि ३८० $ ठेवली आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, डिव्हाइसमध्ये ६.७८-इंचाचा वक्र AMOLED डिस्प्ले आहे, जो १.५K रिझोल्यूशन, १२०Hz रिफ्रेश रेट, ३८४०Hz PWM डिमिंग आणि ४००० निट्स पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यात स्नॅपड्रॅगन ६ जेन १ चिप असून ६,६००mAh बॅटरी आहे. ही बॅटरी ६६W जलद चार्जिंगला सपोर्ट करते.

१०८-मेगापिक्सेलचा कॅमेरा
Honor X9c 5G मध्ये १०८-मेगापिक्सेलचा सॅमसंग HM6 मुख्य कॅमेरा आणि ५-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. सेल्फीसाठी, यात १६-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन मॅजिक ओएस ८.०-आधारित अँड्रॉइड १४ वर चालतो आणि सुरक्षेसाठी इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यात IP65-रेटेड चेसिस आहे, त्याची जाडी 7.98 मिमी आहे आणि वजन 189 ग्रॅम आहे.

हे वाचलंत का :

  1. भारतीय रेल्वेनं केलं स्वारेल अ‍ॅप लाँच, आयआरसीटीसी अ‍ॅप होणार बंद?
  2. एआय शिक्षणासाठी मोठी घोषणा, एआय सेंटर ऑफ एक्सलन्सची घोषणा, ५०० कोटींची तरतुद
  3. Google Pixel 9a चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत लीक, 'या' तारखेला होऊ शकतो लॉंच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.