हैदराबाद BSNL 1499 चा प्लॅन : सरकारी भारतीय टेलिकॉम ऑपरेटर कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आपल्या ग्राहकांना अतिशय परवडणाऱ्या दरात सेवा देत आहे. दरम्यान, कंपनीनं ग्राहकांसाठी एक उत्तम योजना आणली आहे, ज्याच्या मदतीनं तुम्ही एकदा रिचार्ज केल्यावर संपूर्ण वर्षभर टेशनमुक्त होऊ शकता. BSNL नं हा प्लॅन 1499 च्या किमतीत सादर केला आहे. या पॅलनची वैधता 336 दिवस आहे. यासोबतच, या प्लॅनमध्ये अमर्यादित मोफत व्हॉइस कॉल आणि 24 जीबी एफयूपी (Fair Use Policy) डेटा देखील मिळतोय.
BSNL च्या 1499 च्या प्रीपेड प्लॅनचे फायदे
BSNL 1499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 336 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित मोफत व्हॉइस कॉल आणि 24 जीबी एफयूपी डेटा मिळतो. जर तुम्ही हा डेटा संपवला तर तुम्ही अतिरिक्त डेटा व्हाउचरद्वारे रिचार्ज करू शकता.
BSNL काही परवडणारे पर्याय
जर तुम्हाला 1499 रुपयांचा प्लॅन महाग वाटत असेल, तर BSNL काही परवडणारे पर्याय देखील देते. जर तुम्हाला फक्त व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे हवे असतील, तर बीएसएनएल 99 आणि 439 किंमतीचे दोन प्रीपेड प्लॅन ऑफर करते. 99 रुपयांच्या प्लॅनची वैधता 17 दिवस आहे आणि त्यात कोणतीही डेटा सुविधा नाही. 439 रुपयांच्या प्लॅनची वैधता 90 दिवस आहे आणि यामध्येही डेटा दिलेला नाही. खरं तर, 99 च्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एसएमएसची सुविधाही दिली जात नाही, परंतु जर तुम्हाला पोर्ट-आउट मेसेज पाठवायचा असेल तर तुम्ही 1900 वर एसएमएस पाठवू शकता परंतु सामान्य एसएमएस शुल्क लागू होईल.
हे वाचलंत का :