ETV Bharat / state

मुंबई फिरायला आलेल्या महिलेवर हमालाकडून अत्याचार, रेल्वे पोलिसांनी केली आरोपीला अटक - PHYSICAL ABUSE IN TRAIN

वांद्रे स्थानकावर एका महिलेवर अत्याचार (physical abuse) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

mumbai crime news woman physical abuse in train at bandra station, accused arrested
प्रातिनिधिक चित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2025, 11:51 AM IST

Updated : Feb 3, 2025, 2:34 PM IST

मुंबई : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका रिक्षा चालकानं एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर एका महिलेवर हमालानं अत्याचार (physical abuse) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचं सांगितलं जातय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला उत्तराखंडमधून आपल्या मुलासोबत मुंबई फिरण्यासाठी आली होती.

आरोपीला ठोकल्या बेड्या : मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला शनिवारी रात्री आपल्या नातेवाईकांकडं जाणार होती. त्यामुळं काही वेळासाठी ती वांद्रे स्थानकावर झोपली. यावेळी तिकिट तपासण्याच्या बहाण्यानं एक 27 वर्षीय हमाल महिलेजवळ आला. त्यानं तुमच्याकडचं तिकिट दाखवा, असं म्हणत महिलेला बाजूला असलेल्या एका मोकळ्या रेल्वेच्या डब्यात नेलं. यावेळी आरोपीनं जबरदस्तीनं महिलेवर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित महिलेनं रेल्वे पोलिसांकडं धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या.

आरोपीला कोर्टात आज करणार हजर : अटक करण्यात आलेल्या आरोपीला आज (3 फेब्रुवारी) स्थानिक कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तर "पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल", अशी प्रतिक्रिया माध्यमांशी संवाद साधताना जीआरपी (रेल्वे) आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, आता रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेमुळं महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालय.

हेही वाचा -

  1. धक्कादायक : दिराचा वाहिनीवर बलात्कार: पतीही करायचा अनैसर्गिक अत्याचार, पोलीस करणार चौकशी
  2. लग्नाच्या आमिषानं महिलेला ओढलं जाळ्यात; शारीरिक शोषण करुन लुटला लाखोंचा ऐवज, पुण्याच्या भामट्याला कोल्हापुरात बेड्या
  3. शालेय विद्यार्थ्यावर डान्स शिक्षकाने केला लैंगिक अत्याचार; शिक्षकासह संस्थाचालकाला अटक

Last Updated : Feb 3, 2025, 2:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.