जेद्दाह IPL 2025 Mega Auction Players List : आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये खेळण्याची प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. अनेक स्टार खेळाडूंनी यात खेळून आपलं करिअर घडवलं आहे. आयपीएल युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान करतं, जेणेकरुन ते त्यांच्या कारकिर्दीत प्रगती करु शकतील. आयपीएल 2025 मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया इथं आज आणि उद्या होणार आहे. ज्यावर देश आणि जगाच्या नजरा खिळल्या आहेत.
𝐖𝐡𝐚𝐭. 𝐀. 𝐒𝐭𝐚𝐫𝐭 🔥
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
Arshdeep Singh goes to @PunjabKingsIPL
They exercised their Right to Match option!
He's sold for INR 18 Crore! #TATAIPLAuction
पंतनं रचला इतिहास : या लिलावात सर्वांच्या नजरा ऋषभ पंतवर खिळल्या होत्या. पंतला लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघानं सोडलं होतं. त्याच्यावर मोठी बोली लावली जाणार हे निश्चित होतं आणि नेमकं तेच झालं. लखनऊ सुपर जायंट्स संघानं पंतला तब्बल 27 कोटी रुपयांत खरेदी केलं. 2016 नंतर पंत पहिल्यांदाच दिल्लीशिवाय अन्य संघाकडून खेळताना दिसणार आहे. पंत अलीकडं उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या वर्षी कार अपघातानंतर परतल्यानंतर त्यानं खूप धावा केल्या. लखनऊचा संघ त्याला कर्णधार बनवू शकतो.
- अर्शदीप सिंग : 18 करोड, पंजाब किंग्ज
- कगिसो रबाडा : 10.75 करोड, गुजरात टायटन्स
- श्रेयस अय्यर : 26.75 करोड, पंजाब किंग्ज
- जॉस बटलर : 15.75 करोड, गुजरात टायटन्स
- ऋषभ पंत : 27 करोड, लखनऊ सुपर जायंट्स
- मिचेल स्टार्क : 11.75 करोड, रॉयल चैलेंजर्स बेंगळुरु
- मोहम्मद शमी : 10 करोड, सनराइजर्स हैदराबाद
- युजवेंद्र चहल : 18 करोड, पंजाब किंग्ज
- मोहम्मद सिराज : 12.25 करोड, गुजरात टायटन्स
- डेविल मिलर : 7.50 करोड, लखनऊ सुपर जायंट्स
- हैरी ब्रूक : 6.25 करोड, दिल्ली कॅपिटल्स
- देवदत्त पड्डिकल : बोली नाही
- लियम लिव्हिंगस्टोन : 8.75 करोड, रॉयल चैलेंजर्स बेंगळुरु
- डेव्हॉन कॉन्वे : 6.25 करोड, चेन्नई सुपर किंग्स
- ऐडन मार्कराम : 2 करोड, लखनऊ सुपर जायंट्स
- जॅक फ्रेझर मॅकगर्क : 9 करोड, दिल्ली कॅपिटल्स
- रचिन रवींद्र : 4 करोड, चेन्नई सुपर किंग्स
- हर्षल पटेल : 8 करोड, सनराइजर्स हैदराबाद
- रवी अश्विन : 9.75 करोड, चेन्नई सुपर किंग्स
- व्यंकटेश अय्यर : 23.75 करोड, कोलकाता नाईट रायडर्स
- फिल सॉल्ट : 11.50 करोड, रॉयल चैलेंजर्स बेंगळुरु
- क्विंटन डी कॉक : 3.60 करोड, कोलकाता नाईट रायडर्स
- ग्लेन मॅक्सवेल : 4.20 करोड, पंजाब किंग्ज
- ईशान किशन : 11.25 करोड, सनराइजर्स हैदराबाद
𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐂𝐑𝐄𝐀𝐓𝐄𝐃! 💥
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
Shreyas Iyer receives the biggest IPL bid ever - INR 26.75 Crore 💰💰💰💰
He is SOLD to @PunjabKingsIPL 👏👏#PBKS fans, which emoji best describes your mood ❓#TATAIPLAuction
5 खेळाडूंवर 100 कोटी खर्च : ऋषभ पंतला 27 कोटींना लखनऊनं विकत घेतलं. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. याशिवाय श्रेयस अय्यरला 26.75 कोटींना विकत घेतलं. या लीगच्या इतिहासातील तो दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला 18 कोटींना विकत घेतलं. पंजाबने अर्शदीपला आरटीएमखाली घेतलं. तसंच लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही 18 कोटींना विकत घेतलं. तर इंग्लंडच्या जोस बटलरला गुजरात टायटन्सनं विकत घेतले. त्याला 15.75 कोटी रुपये मिळाले. बटलरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. या सर्व खेळाडूंची एकूण किंमत 100 कोटींहून अधिक आहे.
𝐓𝐇𝐄 𝐑𝐄𝐂𝐎𝐑𝐃 𝐈𝐒 𝐁𝐑𝐎𝐊𝐄𝐍 𝐀𝐆𝐀𝐈𝐍! 😮
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
WOWZAAA 💰
Rishabh Pant goes to @LucknowIPL for INR 27 Crore! 💥💥#TATAIPLAuction
IPL लिलावासाठी एकूण 577 खेळाडूंची निवड : यावेळी आयपीएल लिलावासाठी 574 खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यात आणखी तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण 577 खेळाडू लिलावात असतील. यात 367 भारतीय आणि 210 विदेशी खेळाडू आहेत. सर्व 10 फ्रँचायझी एकूण 210 खेळाडू खरेदी करु शकतात. सर्व संघांना त्यांच्या संघात जास्तीत जास्त 25 आणि किमान 18 खेळाडू असू शकतात.
You want pace, you get pace! ⚡️ ⚡️
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
Mohammad Shami joins #SRH for INR 10 Crore 🙌 🙌#TATAIPLAuction | #TATAIPL | @MdShami11 | @SunRisers pic.twitter.com/Jxl8Kv781J
मार्की खेळाडूंवर लागणार प्रथम बोली : IPL 2025 मेगा लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु झाला. यात प्रथम मार्की खेळाडूंवर बोली लावण्यात येत आहे. यावेळी 12 मार्की खेळाडू आहेत. यात ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, जोस बटलर, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, मिचेल स्टार्क, केएल राहुल, युझवेंद्र चहल, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंचा समावेश आहे.
𝙍𝙞𝙜𝙝𝙩 𝙏𝙤 𝙈𝙖𝙩𝙘𝙝 𝙪𝙩𝙞𝙡𝙞𝙨𝙚𝙙 ✅
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
Jake Fraser-McGurk 🤝 Delhi Capitals #TATAIPLAuction | #TATAIPL | @DelhiCapitals pic.twitter.com/AKAverCusp
संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी :
- चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी
- दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल
- गुजरात टायटन्स : राशिद खान, शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान
- कोलकाता नाइट रायडर्स : रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग,
- लखनऊ सुपर जायंट्स : निकोलस पुरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, आयुष बदौनी
- मुंबई इंडियन्स : जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा
- राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, संदीप शर्मा
- सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड
- पंजाब किंग्स : शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल.
हेही वाचा :