पर्थ AUS vs IND 1st Test : पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात, भारतीय संघानं आतापर्यंत संपूर्णपणे वर्चस्व राखलं आहे. ज्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात 150 धावांपर्यंत मर्यादित राहिला होता, पण त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 104 धावांवर आटोपला, तर दुसऱ्या डावात त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. डाव घोषित केला आणि 487 धावा केल्या. यासह भारतीय संघानं एक ऐतिहासिक कामगिरी देखील केली जी आजपर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधीही करु शकला नव्हता.
Stumps on Day 3 in Perth!
— BCCI (@BCCI) November 24, 2024
An exemplary day for #TeamIndia 🙌
Australia 12/3 in the 2nd innings, need 522 runs to win.
Scorecard - https://t.co/gTqS3UPruo#AUSvIND pic.twitter.com/03IDhuArTQ
ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच 500 हून अधिक धावांची आघाडी : पर्थ कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून उत्कृष्ट फलंदाजी दिसून आली ज्यात पहिल्या विकेटसाठी 201 धावांची ऐतिहासिक भागीदारी पाहायला मिळाली. केएल राहुलनं 77 धावांची खेळी खेळली, त्यानंतर यशस्वी जैस्वालनं कसोटी कारकिर्दीतील चौथं शतक झळकावलं आणि 161 धावांची उत्कृष्ट खेळी त्याच्या फलंदाजीत पाहायला मिळाली. यानंतर विराट कोहलीलाही बऱ्याच कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात यश आलं. कोहलीनं 143 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या जोरावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला 534 धावांचं लक्ष्य देण्यात यशस्वी ठरली असतानाच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 500 हून अधिक धावांची आघाडी मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Jasprit Bumrah 🤝 Mohd. Siraj!
— BCCI (@BCCI) November 24, 2024
Two early wickets for #TeamIndia as Nathan McSweeney & Pat Cummins depart.
Live - https://t.co/gTqS3UPruo#AUSvIND | @Jaspritbumrah93 | @mdsirajofficial pic.twitter.com/v8KsJqJxO0
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत 500 हून अधिक धावांची आघाडी घेणारे संघ :
- इंग्लंड - 741 धावा (ब्रिस्बेन कसोटी, 1928)
- दक्षिण आफ्रिका - 631 धावा (WACA स्टेडियम, 2012)
- वेस्ट इंडिज - 573 धावा (ॲडलेड स्टेडियम, 1980)
- दक्षिण आफ्रिका - 538 धावा (WACA स्टेडियम, 2016)
- भारत - 533 धावा (पर्थ ऑप्टस स्टेडियम, 2024)
Captain Jasprit Bumrah puts the perfect finishing touch on India’s stunning day in Perth 👏#WTC25 | 📝 #AUSvIND: https://t.co/9dLP4pnE0g pic.twitter.com/ugTntLznEe
— ICC (@ICC) November 24, 2024
भारतीय संघानं 487 धावा करुन केला डाव घोषित : भारतीय संघानं दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 487 धावा केल्या असून डाव घोषित केला आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं चौकार मारुन शतक पूर्ण करताच कर्णधार जसप्रीत बुमराहनं डाव घोषित केला. परिणामी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 534 धावांची गरज आहे. जे कसोटीच्या चौथ्या डावात जवळपास अशक्यप्राय काम आहे. टार्गेट मोठं असले तरी विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग याआधी ऑस्ट्रेलियात कधीच झाला नव्हता, त्यामुळं यजमान संघासाठी हे आणखी कठीण आहे. यातही कांगारुंच्या हिमालयाइतकं लक्ष्य गाठण्यात तीन विकेट गेल्या आहेत.
Stumps on Day 3 in Perth!
— BCCI (@BCCI) November 24, 2024
An exemplary day for #TeamIndia 🙌
Australia 12/3 in the 2nd innings, need 522 runs to win.
Scorecard - https://t.co/gTqS3UPruo#AUSvIND pic.twitter.com/03IDhuArTQ
400 पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग फक्त एकदाच : या आधी बोलायचं झालं तर 2008 साली ऑस्ट्रेलियात कसोटीच्या चौथ्या डावात सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं WACA मैदानावर 414 धावांचं आव्हान ठेवलं. तेव्हापासून आजपर्यंत एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कधीच झाला नाही. 414 विसरा, 400 धावांचाही पाठलाग करता आला नाही. हे लक्ष्य तर 500 पेक्षा जास्त आहे.
हेही वाचा :