महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नारायण राणेंना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यानं धक्का, कोकणचे मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व संपुष्टात - Narayan Rane - NARAYAN RANE

Narayan Rane : कोकणात रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेत भाजपाच्या पारड्यात टाकणाऱ्या नारायण राणे यांना नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने राणे कुटुंबीयांना राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

Narayan Rane
नारायण राणे (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 8:41 PM IST

मुंबईNarayan Rane :मोदींच्या मंत्रिमंडळात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री असलेल्या राणेंनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत भाजपाचा कोकणतील रत्नागिरी, सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात प्रवेश करून दिला. नारायण राणेंचे मंत्रीपद नक्की असल्याचा विश्वास त्यांच्या निकटवर्तीयांकडून वर्तवला जात होता. तसेच राजकीय जाणकारांना देखील त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, असा अंदाज वाटत होता. परंतु, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने अगदी अनपेक्षितपणे नारायण राणेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट केला आहे. त्यामुळे राणेंचे मंत्रीपद नक्की असा विश्वास असलेल्या राणे समर्थकांचा हिरमोड झाला आहे.

यामुळे राणे समर्थकांचा हिरमोड :कोकणात रत्नागिरी, सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेत भाजपाच्या पारड्यात टाकणाऱ्या नारायण राणे यांना नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने राणे कुटुंबीयांना राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री असलेल्या राणेंनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत भाजपाचा कोकणतील रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात प्रवेश करून दिला. त्यामुळे नारायण राणेंचे मंत्रिपद नक्की असल्याचा विश्वास त्यांच्या निकटवर्तीयांकडून वर्तवला जात होता. तसेच राजकीय जाणकारांना देखील त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, असा अंदाज वाटत होता; मात्र भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने अगदी अनपेक्षितपणे नारायण राणेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट केला आहे. त्यामुळे राणेंचे मंत्रीपद नक्की असा विश्वास असलेल्या राणे समर्थकांचा हिरमोड झाला आहे.

म्हणून राणेंना राजकीय पाठबळ :नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात जुलै, २०२१ मध्ये नारायण राणेंना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली होती. कोकणात शिवसेनेचे प्राबल्य मोडून काढून भाजपाला मजबूत बनवण्यासाठी राणेंना संधी देण्यात आली होती. नारायण राणे, त्यांचे आमदार चिरंजीव नितेश राणे व माजी खासदार असलेले निलेश राणे हे शिवसेनेविरोधात आणि विशेषतः उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरेंविरोधात नेहमी तुटून पडत असतात. त्यामुळे भाजपाची राजकीय गरज म्हणून राणेंना राजकीय बळ देण्यात आले होते. अत्यंत आक्रमक राजकारण करणाऱ्या व मराठा समाजातील असलेल्या राणेंमुळे कोकणात भाजपाला यश मिळण्यासाठी हातभार लागला.

राणेंची शिवसेनेसोबत रस्सीखेच :२०२४ च्या एप्रिल महिन्यात राणेंची राज्यसभेची मुदत संपुष्टात आली तेव्हा त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी देण्यात आली नव्हती. तेव्हापासूनच त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. अपेक्षेप्रमाणे राणेंना लोकसभेची उमेदवारी भाजपातर्फे जाहीर करण्यात आली; मात्र उमेदवारीसाठी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत रस्सीखेच करावी लागली. सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत शेवटपर्यंत उमेदवारीसाठी अतिशय आग्रही होते. शेवटच्या टप्प्यात त्यांनी माघार घेतली; मात्र प्रचारात किरण सामंत यांनी सहकार्य केले नाही व निवडणुकीदरम्यान रश्मी ठाकरेंची भेट घेतल्याचा आरोप निलेश राणेंनी केला होता.

नारायण राणेंनी भाजपाला कोकणातून मोठा विजय मिळवून दिला. त्यांचे मंत्रिपद नक्की आहे, अशी आमची खात्री होती. त्यांना या मंत्रिमंडळात आणखी चांगले खाते मिळेल, अशी आम्हाला आशा होती; मात्र त्यांना डावलण्याचा निर्णय आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आणि दुःखदायक आहे. राणेंच्या अनुभवाचा लाभ भाजपाने देशपातळीवर करून घेण्याची गरज आहे. या निर्णयामुळे आम्ही सुन्न झालो आहोत. राणेंनी शिवसेनेच्या विनायक राऊतांना घरी पाठवून मोठा विजय मिळवला आहे. -- नामदेव चव्हाण, (राणे समर्थक) जिल्हा सचिव, भाजपा उत्तर पश्चिम मुंबई


राणेंना वगळल्याने कोकणाला प्रतिनिधित्व नाही :नारायण राणेंना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने कोकणाचे केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व संपुष्टात आले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुरुवातीला रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे नाव देखील चर्चेत होते; मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसला या मंत्रिमंडळात संधी मिळत नसल्याने राणे व तटकरे दोघांचा पत्ता कट झाल्याने कोकणचे केंद्रीय मंत्रिमंडळातील स्थान संपुष्टात आले आहे.

कार्यकर्ते संभ्रमात :रविवारी सकाळपर्यंत नारायण राणेंना मंत्रिमंडळात संधी मिळेल असा विश्वास असल्याने राणेंचे कार्यकर्ते आनंदात होते; मात्र त्यानंतर त्यांचा पत्ता कट झाल्याचे वृत्त आल्यावर असे कसे घडले याच संभ्रमात कार्यकर्ते होते.

हेही वाचा :

  1. मंत्रिपदासाठी आम्ही वाट पाहायला तयार, कॅबिनेट पद पाहिजे होतं पण....; अजित पवारांची प्रतिक्रिया - Ministerial Allotment
  2. "राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही एका राज्य मंत्रिपदाचा प्रस्ताव दिला होता, पण..."; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? - Narendra Modi Oath Ceremony
  3. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात राज्यातील 'हे' सहा शिलेदार, वाचा त्यांची राजकीय कारकीर्द - Narendra Modi Oath Ceremony

ABOUT THE AUTHOR

...view details