मुंबई Supriya Sule Phone WhatsApp Hacked :महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक (Mobile Hack) झाला आहे. रविवारी दुपारी एकच्या सुमारास सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली.
माझा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करू नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. - खासदार सुप्रिया सुळे
राजकी वर्तुळात खळबळ : "माझा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं आहे. कोणीही मला मेसेज करू नये. या बाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी," अशी पोस्ट खासदार सुप्रिया सुळे यांनी 'एक्स'वर केली आहे. सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाल्याच्या घटनेमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं : सध्या देशात आणि राज्यात पारंपरिक पद्धतीनं होणाऱ्या गुन्ह्यांपेक्षा फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप तसेच ऑनलाइन पद्धतीचा वापर करून होणाऱया सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. अशात काही शिक्षित नागरिक वगळता अनेकांना सोशल मीडियाचा वापर कसा करावा याबाबत अज्ञान आहे. त्यामुळं अशिक्षित नागरिक सोशल मीडियावरील गुन्हेगारीला बळी पडतात. त्यामुळं सायबर गुन्हे रोखण्यासाठी मोबाईल, इंटरनेटद्वारे समाजात जनजागृती करणं आवश्यक आहे.
हेही वाचा -
- राष्ट्रवादीच्या बॅनरवर रोहित पवारांचा फोटोच नाही, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या... - Supriya Sule On Sharad Pawar
- उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस वादात आता सुप्रिया सुळेंची उडी, म्हणाल्या, "मला त्यांच्याकडून या अपेक्षा..." - Supriya Sule On Devendra Fadnavis
- अजित पवारांच्या वेशांतरावरुन तापलं राजकारण; वेशांतर करुन तब्बल दहा वेळा दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट, विरोधक आक्रमक - Ajit Pawar Disguise Controversy