ETV Bharat / state

धाराशिव हादरलं! गाडीवर पेट्रोल, दगड...सरपंचाला जाळून मारण्याचा प्रयत्न - DHARASHIV SARPANCH ATTACK

बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं राज्यातील वातावरण तापलं आहे. आता पुन्हा एकदा एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यात घडली आहे.

Dharashiv Sarpanch Attack
सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल आणि दगड टाकले (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 17 hours ago

धाराशिव : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असतानाच, आता पुन्हा एका सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई गावच्या सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल आणि पेट्रोलचे फुगे टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न गुरुवारी (ता.26) रात्री घडला आहे.

गाडीवर टाकले पेट्रोलचे फुगे : सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीवर हल्ला करत पेट्रोलचे फुगे आणि दगड टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात सरपंचांबरोबर असलेली एक व्यक्ती जखमी झाली असून प्रसंगावधान साधून सरपंचांनी आपला जीव वाचवला. ही घटना कळताच पोलिसांनी घटना स्थळाला भेट देऊन वेगाने तपास सुरू केला आहे. या घटनेमागे कोण आहे? याचा तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि सरपंच नामदेव निकम (ETV Bharat Reporter)

कशी घडली घटना? : हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असल्याची चर्चा आहे. तर निकम यांनी या हल्ल्यामागे पवनचक्कीचा वाद असल्याचा आरोपही केलाय. यावेळी निकम यांनी सांगितलं, "ते रात्री गावाकडं जात असताना दोन मोटारसायकल धारक हॉर्न वाजवत होते. त्यांना पुढं जायचं आहे असं वाटल्यानं आम्ही गाडीचा वेग कमी केला. तर एकाबाजूने दगड मारून गाडीची काच फोडण्यात आली आणि गाडीत पेट्रोलचे फुगे टाकण्यात आले. त्यामुळं आम्ही गाडीचा वेग वाढला तर आमच्या गाडीवर अंडी फोडण्यात आली. त्यामुळं पुढचे काहीच दिसेना म्हणून पुन्हा वेग कमी करावा लागला. त्यानंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला."

पवनचक्की मालकांची दहशत : गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीवरून वातावरण तापलं आहे. पवनचक्की मालकांनी दहशत पसरवण्याचं काम सुरू केलंय. मारहाण, जीवघेणे हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळं जिल्ह्यात पवनचक्क्याच्या नावाने मालकाकडून होणारी ही दहशत पोलीस कशी मोडून काढणार, याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी या घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा -

  1. Video : पेट्रोल टाकून संपूर्ण घरच दिले पेटवून, जीवे मारण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद.. पहा व्हिडीओ
  2. Chapra crime news : वाळू माफियांनी केला खाण निरीक्षकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
  3. अंगणात पाणी गेल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांचा 27 वर्षीय महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.