ETV Bharat / state

'ही' रुग्णवाहिका ठरली नाशिकमधील गर्भवती महिलांसाठी जीवनदायी - 108 AMBULANCE IN NASHIK

नाशिकमधील रूग्णवाहिकेनंं गेल्या १० वर्षात अनेकांना गर्भवती महिलांच्या प्रसुती काळात सेवा दिली आहे. या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

108 AMBULANCE IN NASHIK
१०८ रुग्णवाहिका (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2025, 10:39 PM IST

Updated : Jan 31, 2025, 10:57 PM IST

नाशिक : जिल्ह्यात शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेनं गेल्या दहा वर्षात सर्वाधिक १ लाख २१ हजार ९९३ गर्भवती महिलांच्या प्रसुती काळात सेवा दिली आहे. विशेष म्हणजे यातील ३ हजार १९८ महिलांची प्रसूती ऑन रोड रुग्णवाहिकेत यशस्वीरित्या केली आहे. या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

दहा वर्षांपासून रुग्णवाहिकेची सेवा : वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वांना आठवण येते ती म्हणजे रुग्णवाहिकेची. अशात आपत्कालीन वैद्यकीय सेवा मागील अकरा वर्षापासून पुरवणाऱ्या शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेला गेल्या दहा वर्षात सर्वाधिक १ लाख २१ हजार ९९३ गर्भवती महिलांच्या प्रसूती साठी फोन आलेत. विशेष म्हणजे यातील ३१९८ महिलांची प्रसूती ऑन रोड रुग्णवाहिकेत यशस्वीरित्या झाली आहे. याच श्रेय रुग्णवाहिकेतील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना जाते. या रुग्णवाहिकेमधून रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे. प्रत्येक रुग्णवाहिकेसोबत एका डॉक्टरची नियुक्ती असते. रुग्णवाहिकेला फोन येताच रुग्णवाहिका रूग्णापर्यंत पोहचते. मग प्रसूतीकळा असो सर्पदंश, हृदयविकार यासह अन्य वैद्यकीय गरजांच्या वेळीही रुग्णवाहिका धाव घेते. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात रुग्णवाहिकेला खडतर प्रवास करत पोहोचावे लागते. यामुळे कधी कधी रुग्णवाहिकेंना घटनास्थळी पोहोचण्यास विलंबही लागतो. परिणामी नागरिकांच्या रोषाचाही सामना रुग्णवाहिका चालक आणि डॉक्टरांना करावा लागतो. मात्र, अशातही रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजून गेल्या दहा वर्षापासून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत रुग्णसेवा देत आहे.

रुग्णवाहिका ठरली जीवनदायी; ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट (ETV Bharat Reporter)

एक लाखाहून अधिक नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवली : गेल्या दहा वर्षापासून 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा नाशिक जिल्ह्यात सुरू आहे 46 रुग्णवाहिक यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत 1 लाख 41 हजार 167 नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात आले आहे, यात सर्वाधिक 1 लाख 21 हजार 993 गर्भवती महिलांच्या प्रसूती दरम्यान सेवा देण्यात आली आहे,विशेष म्हणजे 3 हजार 198 महिलांची ऑन रोड प्रसुती रुग्णवाहिकेत यशस्वीरित्या करण्यात आली आहे,यासोबत अपघात,जीवघेणे हल्ले,सर्पदंश, हृदयविकाराचे रुग्ण तसेच इतरांना रुग्णांना सेवा देण्यात आली आहे,रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,नाशिक शहरासाठी लवकरच रुग्णवाहिकेमध्ये वाढ होईल याबाबत प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सांकडून पाठवण्यात आला असल्याचं जिल्हा व्यवस्थापक मनोज बोडके यांनी सांगितल..

रुग्णवाहिकेत सर्व सुविधा उपलब्ध : सुरुवातीपासून मी १०८ क्रमांक रुग्णवाहिकेवर डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. गरिबांसाठी ही अतिशय उपयुक्त सेवा आहे, आणि ही सेवा २४ तास सुरळीतपणे सुरू असते. त्यामुळं ही सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. बऱ्याच वेळेस रुग्णवाहिकेत इमर्जन्सी तसेच प्रसूतीसाठी महिला असतात. त्यांना लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा यात औषध उपचार तसेच सलाईन आणि ऑक्सिजनची सुविधा देखील रुग्णवाहिकेत उपलब्ध असते. त्यामुळं रुग्णांवर उपचार करण्यास सोपे जात असल्याचं डॉक्टर मिलिंद व्यवहारे यांनी सांगितलं

रस्त्याच्या कडेला केली प्रसूती : पिंपळगाव उपजिल्हा रुग्णालयातून एका महिलेला प्रसूतीसाठी १०८ रुग्णवाहिकेतून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नेत असताना रस्त्यात त्यांना अतितीव्र प्रसूती वेदना होऊ लागल्या. यानंतर आम्ही रुग्णवाहिका ओझर गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभी केली. त्या ठिकाणी यशस्वीरित्या त्या महिलेची प्रसूती केली. यात महिला आणि बाळ सुखरूप होत. त्यानंतर आम्ही त्या महिलेला ओझर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल. हे काम करताना खूप समाधान मिळत असल्याच डॉक्टर अश्विनी सोनवणे यांनी सांगितलं.

दहा वर्षात १०८रुग्णवाहिकेचे कार्य :

प्रसुती महिलांना सेवा :१ लाख ४१ हजार १६७
रुग्णवाहिकेत प्रसुती : ३ हजार १९८
अपघात : ३६ हजार ९५०
हृदयविकार रुग्ण : २ हजार ३२४
जीवघेणे हल्ले : ६ हजार ५४
भाजलेले रुग्ण : १ हजार ५८९

हेही वाचा :

  1. कोल्हापुरातील 'या' गावकऱ्यांची 'फिलिंग ढगात", भादवणकरांनी यात्रेसाठी बुक केलं अख्खं विमान
  2. लहानपणी राजकीय हस्तक्षेप होत होते; अलीकडचा काळ हे स्पर्धेचे युग; अजित पवारांचं वक्तव्य
  3. 'महायुती किंवा स्वबळावर, आमची...'; साताऱ्यातील अजितदादांच्या खासदारानं स्पष्टच सांगितलं

Last Updated : Jan 31, 2025, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.