मुंबई : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान आज 27 डिसेंबर 2024 रोजी त्याचा 59वा वाढदिवस साजरा करत आहे. आता सोशल मीडियावर त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये सलमान आपल्या भाचीबरोबर केक कापताना दिसत आहे. त्याची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूर देखील या व्हिडिओमध्ये असल्याची दिसत आहे. सलमानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. दरम्यान संगीतकार साजिद खाननं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सलमान खानच्या वाढदिवसातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या क्लिपमध्ये सलमान हा बहीण अर्पिता खान शर्माबरोबर उभा असल्याचा दिसत आहे.
'भाईजान' सलमान खाननं कापला वाढदिवसाचा केक : याशिवाय सलमानचा मेव्हणा आयुष शर्मा मुलगी आयतला आपल्या कडेवर घेऊन असल्याचा दिसत आहे. या सेलिब्रेशनमध्ये अलविरा खान अग्निहोत्री, निरवान खान, अरबाज खान, शूरा खान, बॉडीगार्ड शेरा हे देखील उपस्थित होते. दरम्यान साजिद खाननं व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि आमची छोटी परी आयला आशीर्वाद. भाऊ तुझ्यावर नेहमीच प्रेम आहे. ' याशिवाय सलमान खानबरोबरचा एक फोटो शेरानं देखील त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यावर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझ्या मालकाचा वाढदिवस, लव्ह यू मालिक.'
सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट : याशिवाय सलमानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रशनमध्ये रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, बॉबी देओल यांनी देखील हजेरी लावली होती. सलमानच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन अर्पिता खान शर्माच्या घरी करण्यात आले होते. सलमान खानच्या वाढदिवसाच्या या विशेष दिवशी अनेकजण त्याला सोशल मीडियाच्या माध्यामातून आता शुभेच्छा देत आहेत. दरम्यान सलमानच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायाचं झालं तर तो 'सिकंदर' चित्रपटामध्ये रश्मिका मंदान्ना आणि काजल अग्रवालबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 2025च्या ईदीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटावर खूप वेगानं काम सुरू आहे. या चित्रपटाच्या रिलीजची अनेकजण वाट पाहात आहेत.
हेही वाचा :