माउंट मौनगानुई NZ vs SL 1st T20I Live Streaming : न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. ही मालिका आज 28 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात पहिले T20 मालिका खेळवली जाणार आहे.
Talking T20!
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 26, 2024
The KFC T20I series against Sri Lanka starts tomorrow night at Bay Oval! Buy tickets | https://t.co/6yy8Hlooyz 🎟️ #NZvSL #CricketNation pic.twitter.com/zXKXhu1L7f
श्रीलंकेचा 16 सदस्यीय संघ : या मालिकेसाठी श्रीलंकेनं 20 डिसेंबरला आपला संघ जाहीर केला आहे. तीन T20 आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत चरिथ असलंका श्रीलंकेच्या 16 सदस्यीय T20 संघाचं नेतृत्व करेल. नोव्हेंबरमध्ये घरच्या T20 मालिकेत न्यूझीलंडचा सामना करणाऱ्या संघाच्या तुलनेत संघात कोणतेही बदल झालेले नाहीत. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचं नेतृत्व चारिथ असालंका करत आहे.
A look ahead to T20I cricket in the Mount 🏏
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 27, 2024
Captain Mitchell Santner looks ahead to the challenge of Sri Lanka and confirms team news for the KFC T20I series opener at Bay Oval tomorrow evening. #NZvSL #CricketNation pic.twitter.com/pGm6WlckEr
मिचेल सँटनरकडे न्यूझीलंडची कमान : न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज मिचेल सँटनरला T20 आणि ODI साठी संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. मिशेल सँटनर औपचारिकपणे केन विल्यमसनची जागा घेणार आहे. मिचेल सँटनरनं गेल्या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर न्यूझीलंडचं नेतृत्व केलं होतं. परंतु ती नियुक्ती केवळ त्या मालिकेसाठी होती. सध्या मिचेल सँटनरकडे अधिकृतपणे T20 आणि वनडे फॉरमॅटसाठी न्यूझीलंडची कमान सोपवण्यात आली आहे. तसंच युवा फलंदाज बेव्हन जेकब्सचा प्रथमच T20 संघात समावेश करण्यात आला आहे.
T20I mode on ✅ #NZvSL pic.twitter.com/KOzuM9DaJS
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 27, 2024
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : 2006 साली श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 25 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत न्यूझीलंड संघानं 14 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेचा संघ फक्त आठ सामने जिंकू शकला आहे. त्याच वेळी, 2 सामने टाय झाले आहेत आणि 1 सामन्याचा निकाल लागला नाही. न्यूझीलंडमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 8 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत न्यूझीलंड संघानं सहा सामने जिंकले असून एक सामना गमावला आहे. त्याच वेळी, 1 सामना बरोबरीत आहे.
Getting set for the summer of T20 international cricket with some fun in the sun! ☀️🏏 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/kk61fZT2Gl
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 27, 2024
मालिकेतील सामने कधी आणि कुठं खेळवले जातील?
न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील आगामी T20 मालिकेतील पहिला सामना 28 डिसेंबर रोजी होणार आहे. यानंतर दुसरा T20 सामना 30 डिसेंबरला आणि तिसरा T20 सामना 2 जानेवारी 2025 रोजी खेळवला जाईल. पहिले दोन T20 सामने बे ओव्हल इथं आणि तिसरा T20 सेक्स्टन ओव्हल इथं होणार आहे. मालिकेतील पहिले 2 सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 11:45 वाजता खेळवले जातील. तर तिसरा सामना सकाळी 5:45 वाजता सुरू होईल. हे सर्व सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि सोनी लाइव्ह ॲपवर थेट पाहता येतील. या T20 मालिकेनंतर उभय संघांमध्ये 5, 8 आणि 11 जानेवारी 2025 रोजी तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.
A young batter already receiving global attention has been included in New Zealand's T20I squad to face Sri Lanka 👀
— ICC (@ICC) December 23, 2024
More from #NZvSL as Mitch Santner takes over as Kiwi white-ball captain 👇https://t.co/DJv53ZHovW
मालिकेसाठी दोन्ही संघ :
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मिच हे, मॅट हेन्री, बेव्हॉन जेकब्स, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन आणि नॅथन स्मिथ.
श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कामिंदू मेंडिस, दिनेश चंडिमल, भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, महिश थेक्षाना, जेफ्री वांडर्से, चमिथरामा, नुक्शाहरा, चमिथरा, नुक्शाहाना, चमिंडू असेरा. फर्नांडो, बिनुरा फर्नांडो.
हेही वाचा :