मुंबई - दक्षिण भारतातील लोकप्रिय आणि यशस्वी बॅनर म्हणून होम्बाळे फिल्म्स नावारुपाला आली आहे. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तर कमाईचे उच्चांक गाठलेत परंतु ओटीटीवरही हे चित्रपट अव्वल स्थावर आहेत. 'सालार: - सीझफायर भाग 1' या चित्रपटाला म्हणून मोठ्या यशाचा आनंद मिळत आहे, 300 दिवसांपेक्षा जास्त काळ हा सिनेमा ट्रेंड करत आहे. तर 'बघीरा'नं हॉटस्टारवर नंबर 1 स्थान मिळविलं आहे!. 'बघीरा' हा बहुप्रतिक्षित चित्रपटाचं दिग्दर्शन डी.आर. सूरी यांनी केलंय. शक्तिशाली VFX, मनोरंजक कथा आणि उत्कृष्ट पार्श्वसंगीतासह, चित्रपट अॅक्शन-पॅक मनोरंजनाची खात्री देणारा आहे.
'बघीरा' या चित्रपटानं लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटाला सकारात्मक रिव्ह्यू मिळाले असून उत्तम रेटिंगही प्राप्त झालंय. हा चित्रपट सध्या हॉटस्टारवर नंबर 1 वर ट्रेंड करत आहे. होम्बाळे फिल्म्सच्या 'बघीरा' चित्रपटाची घोडदौड निरंतर सुरू आहे. या चित्रपटाला सर्वच स्तरातून प्रचंड प्रेम आणि कौतुक मिळाले असले तरी बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं आपला दबदबा कायम राखला.
'बघीरा' हा 2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला आहे. हॉटस्टारवर रिलीज झाल्यानंतर बघीराला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्याचे ब्लॉकबस्टर यश कायम ठेवत, हा चित्रपट हॉटस्टारवर सतत पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. 'बघीरा'ला किती प्रेम मिळतंय हे यावरून स्पष्ट होतं.
इमोशनल सीन्स आणि थरारक वळणांनी भरलेल्या, 'बघीरा'मध्ये श्रीमुरलीनं एक शक्तीशाली पात्र साकारलं आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या रुक्मिणी वसंतनं त्याच्या भूमिकेला चांगली साथ दिली आहे. यामुळं कथा आणखीनच सशक्त झाली आहे. 'बघीरा'मधील प्रकाश राजचा जबरदस्त अभिनय त्याच्या प्रतिभेला साजेसा आहे, तर रंगायन रघूचा विनोद हा चित्रपट हलक्याफुलक्या क्षणांनी बहरला आहे.
होंबळे फिल्म्स प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत असताना, त्यांच्याकडे 'कंतारा: भाग 1', 'सालार: भाग 2', 'शौर्यंगा पर्वम' आणि बरेच काही मनोरंजक चित्रपट आहेत.