वडोदरा India Clean Sweep West Indies in ODI : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना वडोदरा इथं खेळला गेला. हा सामना जिंकून भारतीय संघानं वेस्ट इंडिजचा मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला आहे. भारतानं तिसरा सामना 5 विकेटनं जिंकला. दीप्ती शर्मानं हा सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिसऱ्या सामन्यात दीप्तीनं अप्रतिम गोलंदाजी करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
A splendid spell of 6⃣/3⃣1⃣
— BCCI Women (@BCCIWomen) December 27, 2024
A vital knock of 3⃣9⃣*@Deepti_Sharma06 is named the Player of the Match for her spectacular all-round efforts. 👏
Scorecard ▶️ https://t.co/cjHiI787hV#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/jGDFx8ii9F
भारतानं 5 विकेटनं जिंकला सामना : या सामन्यात वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 38.5 षटकात केवळ 162 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून फलंदाजी करताना चिनेल हेन्रीनं सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. तर भारताकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्मानं सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. याशिवाय रेणुका सिंगनं 4 विकेट घेतल्या. यानंतर 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाची सुरुवातही विशेष झाली नाही. भारतानं 55 धावांतच 3 विकेट गमावल्या होत्या. भारतीय संघानं हे लक्ष्य 28.2 षटकात 5 विकेट गमावून पूर्ण केले. भारताकडून फलंदाजी करताना दीप्ती शर्मानंच सर्वाधिक 39 धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 32 धावा केल्या. तर जेमिमानं 29 धावांची इनिंग खेळली होती. तर ऋचा घोष 29 धावा करुन नाबाद राहिली.
𝙏𝙝𝙖𝙩 𝙬𝙞𝙣𝙣𝙞𝙣𝙜 𝙛𝙚𝙚𝙡𝙞𝙣𝙜! 🤩
— BCCI Women (@BCCIWomen) December 27, 2024
Captain @ImHarmanpreet receives the @IDFCFIRSTBank Trophy 🏆#TeamIndia win the ODI series 3-0 💪 pic.twitter.com/glblLcPBc7
दीप्ती शर्मानं रचला इतिहास : या सामन्यात दीप्ती शर्मानं 6 विकेट घेत इतिहास रचला. आता दीप्ती वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 बळी घेणारी पहिली भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे. वनडे क्रिकेटमध्ये तिच्या नावावर तीन पाच विकेट्स हॉल आहेत.
1⃣0⃣Overs
— BCCI Women (@BCCIWomen) December 27, 2024
3⃣ Maidens
3⃣1⃣ Runs
6⃣ Wickets
That was one impressive performance from Deepti Sharma! 🙌 🙌
Drop an emoji in the comments below to describe that display 🔽
Updates ▶️ https://t.co/SKsWib5uuE#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/nvaIr8Pjfi
भारतीय संघानं जिंकले सर्व सामने : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. भारतानं यातील तिन्ही सामने जिंकले आहेत. भारतीय संघानं पहिल्या सामन्यात 211 धावांनी आणि दुसऱ्या सामन्यात 115 धावांनी विजय मिळवला आणि तिसऱ्या सामन्यात त्यांचा 5 विकेट्सनं विजय झाला. या कालावधीत रेणुका सिंह ठाकूरनं एकूण 10 विकेट घेतल्या. तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. याआधी 3 सामन्यांची T20 मालिकाही खेळली गेली होती. यामध्ये भारताने वेस्ट इंडिजचा 3-0 असा क्लीन स्वीप केला होता.
Consistently setting the tone ✅
— BCCI Women (@BCCIWomen) December 27, 2024
Bowling incisive spells ✅
Highest wicket-taker in the series (10 wickets) ✅#TeamIndia pacer Renuka Singh Thakur is named the Player of the Series 🙌🙌
Scorecard ▶️ https://t.co/cjHiI787hV#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vSNWryZqv3
हेही वाचा :