महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 5:14 PM IST

Updated : Mar 28, 2024, 9:34 PM IST

ETV Bharat / state

अभिनेता गोविंदा पुन्हा राजकारणात; शिंदेंच्या शिवसेनेत केला प्रवेश, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लढणार निवडणूक? - Actor Govinda joins Shiv Sena

Actor Govinda joins Shiv Sena : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आहुजा यांनी गुरुवारी (28 मार्च) शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं. मुंबईतील शिवसेना बाळासाहेब भवनात गोविंदा यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गोविंदा यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

Govinda Ahuja joined Shiv Sena
Govinda Ahuja joined Shiv Sena

एकनाथ शिंदे, गोविंदा यांची पत्रकार परिषद

मुंबई Actor Govinda joins Shiv Sena : अभिनेते गोविंदा आहुजा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी 'धनुष्यबाण' हाती घेतलंय. मुंबई पश्चिम-उत्तर मतदार संघातून गोविंदा यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. या जागेसाठी ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केलीय. गोविंदा हे स्टार प्रचारक म्हणून काम करतील, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गोविंदासोबतच अभिनेत्री करीना कपूर, करिश्मा कपूर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय.

शिवजयंतीच्या शुभ दिनी आपले लाडके लोकप्रिय अभिनेते गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. सगळ्यांना आवडणारे गोविंदा शिवसेनेत दाखल झाले. सर्व समाजात लोकप्रिय असलेल्या गोविंदा यांचं मी अभिनंदन करतो. मी त्यांना शुभेच्छा देतो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंचे मानले आभार : "गेली दहा-पंधरा वर्षे देवाचं स्मरण करूनच मी माझं काम करत आहे. मी राजकारणापासून दूर जात होतो. एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. माझ्यावर दिलेली जबाबदारी मी पूर्ण करेन. मला कला आणि संस्कृतीसाठी काम करायला आवडेल. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपल्या देशात चित्रपट असो वा चित्रकूट, ते कला आणि संस्कृतीचे प्रतीक आहे," अशी प्रतिक्रिया गोविंदा यांनी दिली.

मी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळं माझा 14 वर्षांचा वनवास संपलाय. मी रामराज्यात आलो असं वाटतंय. मला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. पक्षातील माझा प्रवेश म्हणजे देवाची कृपा आहे, असं मला वाटतं. मी 2004 ते 2009 या काळात राजकारणात होतो. नंतर बाहेर आलो. मला वाटलं या बाजूला काही दिसणार नाही. मात्र, 2010 ते 2024 या 14 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा नव्यानं सुरुवात होत आहे. मी पुन्हा राजकारणात, शिवसेनेत परतलो आहे - गोविंदा, अभिनेते

गोविंदा शिवसेनेचे स्टार प्रचारक : "गोविंदा मला भेटून बोलले की मुंबईत बदल होत आहे. सकारात्मक बदल होत आहेत. या सर्व कामामुळं गोविंदा यांच्यावर प्रभाव पडला. राज्यात देखील काम जोरात सुरू आहेत. कामांच्या मुद्द्यावर ते आपल्या सोबत आले आहेत. बॉलिवूडमध्ये काम करायचं आहे असं त्यांनी म्हटलं. त्यांनी कोणतीही अट घातलेली नाही. राम मंदिर देखील झालंय. त्यामुळंच सगळीकडंच गोविंदा- गोविंदा आहे. आपलं सरकार आल्यानंतर गोविंदा सणसुद्धा सुरू केला," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. "तसंच गोविंदा हे स्टार प्रचारक म्हणून काम करतील. गोविंदा यांना निवडणूक लढवायची नाही असं त्यांनी सांगितलंय. त्यांना बॉलिवूडसाठी काम करायचंय," असं शिंदे म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. काँग्रेसच्या रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज ठरला अवैध, महाविकास आघाडी निकालापूर्वीच बॅकफूटवर - rashmi barve caste verification
  2. 'हट्ट कुणाचाही असो, हक्क तुमचाच'; साताऱ्याच्या उमेदवारीसाठी अजित पवार यांना कार्यकर्त्यांचा आग्रह - Ajit Pawar Group
  3. अडसूळ, कडू यांचा विरोध असतानाही भाजपाकडून नवनीत राणांचं तोंड गोड - Amravati Constituency War
Last Updated : Mar 28, 2024, 9:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details