ETV Bharat / entertainment

हृतिक रोशननं 'फ्युरियस 7'सह 'या' चित्रपटांचे ऑफर्स नाकारले, जाणून घ्या नावे... - HRITHIK ROSHAN BIRTHDAY

बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करणाऱ्या अनेक चित्रपटांना हृतिक रोशननं नकार दिला आहे. आज आम्ही हृतिकच्या वाढदिवसानिमित्त याबद्दल सांगणार आहोत.

hrithik roshan
हृतिक रोशन (hrithik roshan (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 5 hours ago

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आज 51 वर्षांचा झाला आहे. 10 जानेवारी रोजी तो आपला वाढदिवस साजरा करत आहे. हृतिक रोशननं त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र त्यानं 9 जानेवारी रोजी 'द रोशन' नावाच्या कौटुंबिक माहितीपटाचा ट्रेलर लाँच केला आहे. हृतिक रोशनला त्याचा पहिला चित्रपट 'कहो ना प्यार है'मधून जगभरात प्रसिद्धी मिळाली. त्यानं आपल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिली आहेत. मात्र त्यानं अनेक चित्रपट नाकारले, जे मोठे ब्लॉकबस्टर ठरले. आता हृतिकनं कोणते चित्रपट नाकारले याबद्दल जाणून घेऊया.

लगान (2001) : 'लगान' चित्रपटात आशुतोष गोवारीकरनं आमिर खाननं साकारलेल्या भुवनच्या भूमिकेसाठी प्रथम हृतिक रोशनशी संपर्क केला होता, मात्र समोर काहीही झाले नाही. हा चित्रपट ऑस्करसाठी गेला होता. 'लगान'ला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट श्रेणीतचं नामांकन मिळालं होतं.

दिल चाहता है (2001) : फरहान अख्तर दिग्दर्शित 'दिल चाहता है' हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. हृतिक रोशनला चित्रपटात अक्षय खन्नाची, सिड सिन्हाची भूमिका ऑफर झाली होती, मात्र त्यानं याला नाकारलं.

स्वदेश (2004) : 2004 मध्ये प्रदर्शित झालेला शाहरुख खान स्टारर 'स्वदेस' हृतिक रोशन करू शकला नाही. शाहरुख खानच्या आधी आशुतोष गोवारीकरनं 'स्वदेश' चित्रपटासाठी हृतिक रोशनची निवड केली होती. हृतिकनं चित्रपटाची पटकथाही वाचली होती, मात्र तो हा चित्रपट करू शकला नाही. 'स्वदेश' ऑस्कर नामांकनपासून हुकला, पण या चित्रपटानं अनेक पुरस्कार जिंकली.

रंग दे बसंती (2006) : राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित 'रंग दे बसंती' या देशभक्तीपर चित्रपटात आमिर खानसह अनेक स्टार्स दिसले. या चित्रपटातील करण सिंघानियाची भूमिका साऊथ अभिनेता सिद्धार्थनं केली. प्रथम ही भूमिका हृतिकला ऑफर झाली होती. मात्र त्यानं ही भूमिका करण्यासाठी नकार दिला.

बाहुबली- द बिगनिंग (2015) : 'बाहुबली-द बिगिनिंग' हा चित्रपट साऊथ चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर यांनी केली होती. हा चित्रपट प्रभासच्या आधी हृतिक रोशनला ऑफर करण्यात आला होता, मात्र या काळात हृतिक रोशन हा दुसऱ्याच प्रोजेक्टवर काम करत होता. त्यामुळे त्यानं हा चित्रपट करण्यासाठी नकार दिला होता. 'बाहुबली-द बिगिनिंग' हा सुपरहिट चित्रपट होता.

फास्ट एंड फ्यूरियस 7 (2015) : रिपोर्ट्सवर हृतिक रोशननं फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड चित्रपटांनाही नकार दिला आहे. 'फास्ट एंड फ्यूरियस'चे दिग्दर्शक रोब कोहन हे हृतिक रोशनचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांना 'फास्ट एंड फ्यूरियस' चित्रपटाच्या सातव्या भागात हृतिकला कास्ट करायचे होते, मात्र बॉलिवूडमधील त्यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे तो हा चित्रपट करू शकला नाहीत. या चित्रपटानं जगभरात 13 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

हेही वाचा :

  1. 'कोई मिल गया' ते 'क्रिश'पर्यंत, हृतिक रोशनला 'या' 5 आयकॉनिक पात्रांमुळे मिळाली चित्रपटसृष्टीत ओळख...
  2. रोशन घरण्याची चित्तरकथा, 'द रोशन्स' उलगडणारं हृतिकच्या कुटुंबाची गुपितं
  3. "तुम्ही मला जबाबदार बनवलं" म्हणत हृतिक रोशननं मीडियासमोर उलगडली 25 वर्षांची कारकिर्द, वाचा तो काय म्हणाला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.