ETV Bharat / entertainment

'कहो ना प्यार है' गाण्यावर थिरकला हृतिक रोशन, बॉलिवूडच्या 'ग्रीक गॉड'नं धूमधडाक्यात साजरा केला वाढदिवस - HRITIK ROSHAN BIRTHDAY

हृतिक रोशनचा 51 वा वाढदिवस थाटामाटात साजरा झाला. यावेळी त्यानं चाहत्यांबरोबर 'कहो ना प्यार है' या गाण्यावर नेत्रदीपक डान्स केला.

Hritik Roshan
हृतिक रोशन ((ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 4 hours ago

मुंबई - बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा हृतिक रोशन आज ५१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. हा दिवस त्याच्यासाठी खास आहे, कारण त्याच्या पदार्पणाचा 'कहो ना प्यार है' या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण होत असून हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आपल्या आकर्षक पर्सनॅलिटीनं आणि शरिरसौष्ठवानं चाहत्यांसह सर्वांना वेड लावणाऱ्या हृतिकनं भारतीय चित्रपटसृष्टीत एक आढळ स्थान मिळवलं आहे. त्यानं आपला वाढदिवस चाहत्यांसह वडिलांबरोबर साजरा केला.

'कहो ना प्यार है' या चित्रपटाच्या २५ वर्षांनंतरच्या विशेष अॅडव्हान्स स्क्रिनिंगमध्ये हृतिक रोशननं एक दिवस आधी चाहते आणि माध्यमांबरोबर त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एवढंच नाही तर त्यानं त्याच्या चाहत्यांबरोबर स्टेजही शेअर केलं. व्हायरल व्हिडिओमध्ये तो 'कहो ना प्यार है' या गाण्याच्या शीर्षक गाण्यावर हुक स्टेप करताना दिसत आहे.

१० जानेवारी रोजी हृतिक रोशन त्याच्या वाढदिवसाबरोबरच 'कहो ना प्यार है' या चित्रपटाची २५ वर्षे साजरी करत आहे. 'कहो ना प्यार है' हा हृतिक आणि अमिषा पटेल दोघांचाही पहिला चित्रपट होता. हा चित्रपट १४ जानेवारी २००० रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी झाला. या सिनेमामुळं हृतिक एका रात्रीत स्टार बनला आणि आजही तो चमकत आहे. २५ वर्षांनंतर आज पुन्हा एकदा हृतिक रोशनचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हृतिकचा पहिला 'कहो ना प्यार है' हा चित्रपट त्याचे वडील राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला होता.

आजवर अनेक चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकलेला हृतिक रोशन आता 'वॉर 2' या भव्य युद्धपटात पुन्हा झळकणार आहे. हा चित्रपट त्याच्या २०१९ मध्ये रिलीज झालेल्या 'वॉर' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंग दरम्यान, त्यानं सांगितलं की तो या चित्रपटासाठी एक खास डान्सिंग गाणं बनवणार आहे. याचित्रपटामध्ये त्याच्याबरोबर साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर देखील दिसणार आहे.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.