ETV Bharat / technology

इस्रो आणि आयआयटी मद्रासनं संयुक्तपणे केली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप विकसित - ISRO SEMICONDUCTOR CHIP

इस्रो आणि आयआयटी मद्रास यांनी संयुक्तपणे स्वदेशी सेमीकंडक्टर चिप विकसित केली. या चिपचा वापर अंतराळ मोहिमांमध्ये केला जाणार आहे.

semiconductor chip
सेमीकंडक्टर चिप (IIT Madras)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 13, 2025, 9:52 AM IST

हैदराबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि आयआयटी-मद्रास यांनी संयुक्तपणे शक्ती तंत्रज्ञानावर आधारित स्वदेशी अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) चिप विकसित केलीय. त्याला 'इंडिजिनस RISCV कंट्रोलर फॉर स्पेस अॅप्लिकेशन्स' (IRIS) असं नाव देण्यात आलं आहे. ही चिप अंतराळात वापरल्या जाणाऱ्या प्रणाली आणि उपकरणांसाठी बनवली आहे. ही चिप चंदीगड येथील सेमीकंडक्टर प्रयोगशाळेत तिरुवनंतपुरम येथील इस्रो इनर्शियल सिस्टम्स युनिटच्या सहकार्यानं तयार करण्यात आली. ही चीप कर्नाटकातील टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्समध्ये पॅक करण्यात आलीय.

अंतराळ मोहिमांना प्रगती
आयआरआयएस चिपचा वापर आयओटी, संगणक प्रणाली आणि अंतराळ मोहिमांमध्ये केला जाऊ शकतो. यामध्ये शक्ती प्रोसेसर वापरण्यात आलं आहे. चिपची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अॅडव्हान्स्ड सिरीयल बस, कॉर्डिक आणि वॉचडॉग टाइमर सारखे मॉड्यूल यात जोडले आहेत. भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये त्याला अधिक चांगला वापर होणार आहे. एससीएल चंदीगड येथे आम्ही विकसित केलेली ही तिसरी शक्ती चिप आहे. चिप डिझाइन, फॅब्रिकेशन, पॅकेजिंग, मदरबोर्ड डिझाइन, चिप असेंब्ली आणि बूटिंग हे सर्व भारतात केलं जातं.

चिपशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी

या चिपच्या निर्मितीनं भारताच्या सेमीकंडक्टर स्वावलंबनाच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. या चिपच्या निर्मितीमुळं भारताची जागतिक अंतराळ क्षमता देखील वाढली आहे. या चिपच्या निर्मितीवरून असं दिसून येतं की भारताकडं उच्च दर्जाचं सेमीकंडक्टर तंत्रज्ञान तयार करण्याची क्षमता आहे.

काय आहे खास? : ही प्रणाली एक कस्टम प्रोसेसर आहे, जी RISC-5 वर आधारित आहे. जी एक ओपन-सोर्स इंस्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर (ISA) आहे. 'डिजिटल इंडिया रिस्क-5 उपक्रम (DIR-5) अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून 'शक्ती' विकसित केली जात आहे. मायक्रोप्रोसेसर आधारित उत्पादनांच्या स्वदेशी विकासाला प्रोत्साहन देणं हे मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे.

हे वाचलंत का :

  1. नासानं क्रू10 मोहिमेत केला बदल, अंतराळवीर सुनीता विल्यम्स कधी परतणार पृथ्वीवर?
  2. भारतात इंस्टाग्राम 'टीन अकाउंट' फीचर लाँच, पालकांना मुलांवर ठेवता बारकाईनं लक्ष
  3. देशभरात डिस्ने+ हॉटस्टार सेवा क्रॅश, सोशल मीडियावर तक्रारीचा पाऊस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.