मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 आम्ही 'इंडिया' आघाडीनं एकत्र लढवली. मात्र लोकसभा निवडणूक झाल्यापासून 'इंडिया' आघाडीची एकही बैठक झाली नाही. कोणतीही चर्चा नाही, कोणताही संवाद नाही, ओमर अब्दुल्ला, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल हे सर्व नेते 'इंडिया' अलायन्सचं आता अस्तित्वच नाही, असं म्हणतात. त्यामुळे मोठा पक्ष म्हणून या सगळ्यांना काँग्रेस पक्ष जबाबदार आहे, असा हल्लाबोल उबाठा खासदार संजय राऊत यांनी केला. जर 'इंडिया' आघाडी एकदा तुटली, तर पुन्हा कधीही तयार होणार नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
#WATCH | Mumbai, Maharashtra: On INDIA alliance, Shiv Sena UBT MP Sanjay Raut says, " we fought the lok sabha elections together and the results were also good. after that it was the responsibility of all of us, especially congress, to keep the india alliance alive, sit together… pic.twitter.com/t85MlvDDKj
— ANI (@ANI) January 10, 2025
इंडिया आघाडीत कोणताही समन्वय, संवाद नाही : "'इंडिया' आघाडी जीवंत ठेवणं मोठा पक्ष म्हणून काँग्रेसचं काम होतं. मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतर 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांची एकही बैठक झाली नाही. आघाडीत कोणताही समन्वय नाही, चर्चा नाही, संवाद नाही. त्यामुळे देशभरातील नेत्यांची 'इंडिया' आघाडीवर नाराजी आहे. ओमर अब्दुल्ला, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल हे सर्व नेते आता 'इंडिया' अलायन्सचं अस्तित्व नाही, असं म्हणत आहेत," असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला.
इंडिया आघाडीतील स्थितीला काँग्रेस जबाबदार : "आम्ही लोकसभा निवडणूक एकत्र लढवली आणि निकालही चांगले लागले. त्यानंतर 'इंडिया' आघाडी जीवंत ठेवणं, एकत्र बसणं आणि पुढं जाण्याचा मार्ग दाखवणं ही काँग्रेसची जबाबदारी होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अशी एकही बैठक झालेली नाही. 'इंडिया' आघाडीसाठी हे योग्य नाही. आघाडीतील सर्वात मोठा पक्ष काँग्रेस यासाठी जबाबदार आहे. आघाडीबाबत लोकांना शंका आहे. आता जर ही आघाडी तुटली तर ती पुन्हा कधीही तयार होणार नाही," असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा :
- पृथ्वीराज चव्हाण यांच्या 'आप'लेपणावरून काँग्रेसमध्ये नाराजी; संजय राऊत म्हणाले, "मी सहमत"!
- अमित शाहांना खूश करण्यासाठी खासदार फोडाफोडी; आरएसएसचं बुथ मॅनेजमेंट घोटाळ्याचं, संजय राऊतांचा हल्लाबोल
- भाजपा लोकशाहीच्या मुळावर उठलेला पक्ष; अरविंद केजरीवालांना देशद्रोही ठरवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न चुकीचा, संजय राऊतांचा हल्लाबोल