ETV Bharat / entertainment

"मनालीसाठी विमानानं न जाता अयान मुखर्जीनं केली होती एक हुशारी", कल्की कोचलिननं केला युक्तीचा खुलासा - AYAN MUKERJI CLEVER TRICK

'ये जवानी है दिवानी' चित्रपटाचं शूटिंग मनालीत पार पडलं होतं. यासाठी कलाकारांची टीम दिल्लीहून जाणार होती. परंतु अयान मुखर्जीनं त्यांना विमानानं पाठवलं नाही.

Yeh Jawaani Hai Deewani
ये जवानी है दिवानी (Yeh Jawaani Hai Deewani poster/ANI)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 4 hours ago

मुंबई - दिग्दर्शक अयान मुखर्जी याच्या 'ये जवानी है दिवानी' चित्रपटाचं शूटिंग मनालीत होणार होतं. या शूटिंगसाठी दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, कल्की कोचलिन, आदित्य रॉय कपूरइतर कलाकार यांना हजर राहायचं होतं. हे सर्व कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करणार असल्यामुळं अयान मुखर्जीनं एक युक्ती केली आणि सर्वांच्या प्रवासासाठी दोन कारची व्यवस्था केली. अशा प्रकारे सर्व कलाकार कारमधून मनालीला पोहोचले. पण यासर्व कलाकारांना विमानानं पाठवणं अयानला स्वस्त आणि सोपं पडणारं असतानाही त्यानं कारमधून पाठवण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा कल्की कोचलिननं केला आहे.

२०१३ मध्ये गाजलेल्या ब्लॉकबस्टर 'ये जवानी है दिवानी' चित्रपटात अदितीची भूमिका साकारणारी कल्की कोचलिननं चित्रपटातील मुख्य कलाकारांमधील दरी मिटविण्यासाठी मनालीला रोड ट्रिप आयोजित करण्याच्या अयान मुखर्जीच्या प्रतिभावान युक्तीची आठवण करून दिली.

"अयान मुखर्जीने एक गोष्ट केली कारण चित्रपटापूर्वी आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. आम्हाला वाचनासाठी जास्त वेळ मिळत नव्हता. आमचं शूटिंगचं पहिलं ठिकाण मनाली होतं. म्हणून त्यानं दिल्ली ते मनाली रोड ट्रिप करण्याचा निर्णय घेतला. त्यानं आम्हाला विमानाने जाऊ दिले नाही. त्यानं दोन कारची व्यवस्था केली आणि एका कारमध्ये रणबीर, दीपिका, मी आणि आदित्य होतो. तो आणि इतर लोक दुसऱ्या कारमध्ये होतो. आम्ही मनालीला रोड ट्रिप केली आणि अशा प्रकारे आम्ही एकमेकांना ओळखू लागलो."

कल्की कोचलिनला असा विश्वास वाटतो की, रोड ट्रिपमुळे खूप फरक पडला आणि कलाकारांमध्ये चांगले बंध निर्माण झाले. धाब्यावर थांबणं, एकत्र जेवणं, लहान गावांमध्ये बाथरूम वापरणं, आमच्या आयुष्याबद्दल बोलणं, असं आम्ही सर्व काही केलं. जर तुम्ही बिझनेस क्लासमध्ये एक तासाची फ्लाइट घेतली आणि पोहोचलात तर ते खूप वेगळं आहे. परंतु, कारमधील ८ तास खूप फरक पाडणारे होते. अयाननं केलेली ही एक अतिशय हुशारीची चाल होती," असं कल्की पुढं म्हणाली.

'ये जवानी है दिवानी' हा २०१३ चा सर्वाधिक कमाई करणारा चौथा हिंदी चित्रपट ठरला होता. अयान मुखर्जी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि त्यात रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, कल्की कोचलिन आणि आदित्य रॉय कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

मुख्य कलाकारांमध्ये एक मजेदार नातं होतं जे चित्रपटातही स्पष्टपणे दिसून येतं. कल्कीनं चित्रपटातील एक गोड आठवण सांगितली. "मला आठवतंय जेव्हा आम्ही काश्मीरमधील गुलमर्गमध्ये बर्फात शूटिंग करत होतो. दीपिका आणि मी रणबीर आणि आदित्यच्या टी-शर्टमध्ये बर्फ घालायचो आणि जेव्हा ते तेच करायचे तेव्हा आम्ही त्यांना 'बाल खरब हो जायेगा' असं म्हणत थांबवायचो. पण, उदयपूरमधील हळदी समारंभात त्यांनी त्याचा बदला घेतला. त्यांना माझ्यावर हळदीचा ठिपका लावायचा होता पण त्यांनी माझ्यावर हळदी ओतली. त्यांनी माझ्यावर हळदीने हल्ला केला होता."

'ये जवानी है दिवानी' हा २०१३ चा हा ब्लॉकबस्टर चित्रपट ३ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा प्रदर्शित झाला होता. त्यावेळी मोठ्या पडद्यावर त्यांचा आवडता चित्रपट पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहात गर्दी केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

"खूप छान वाटतंय. सर्वांना थिएटरमध्ये नाचताना पाहणं. सर्वांना गाणी माहित आहेत. जवळजवळ एकाच वेळी ते पुन्हा अभिनय करत असल्यासारखे वाटतं. आम्ही हा चित्रपट बनवला तेव्हा एक वेगळी पिढी हा चित्रपट पाहत होती. हा चित्रपट आता पुढच्या तरुण पिढीकडे गेला आहे आणि मला म्हणायचं आहे की, यात कालातीतता आहे की पुढची पिढी देखील त्याच्याशी संबंधित राहू शकेल हे छान आहे."

कल्की कोचलिन 'नेसिप्पया' या चित्रपटातून तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. ही अभिनेत्री एका वकिलाची भूमिका साकारत आहे. विष्णुवर्धन यांनी याचे दिग्दर्शन केले आहे तर युवान शंकर राजा यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.