मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Death Anniversary) यांचा आज (17 नोव्हेंबर) बारावा स्मृतीदिन आहे. आजच्याच दिवशी 17 नोव्हेंबर 2012 ला वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) अनेक नेते, शिवसैनिक दाखल होत आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सकाळपासूनच शिवतिर्थावर शिवसैनिकांची गर्दी पहायला मिळत आहे.
शिवतिर्थावर उद्धव ठाकरेंकडून अभिवादन : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि इतर शिवसैनिकांसह शिवतिर्थावर जात बाळासाहेब यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. यावेळी शिवसेना (उबाठा) नेते अनिल देसाई हेदेखील उपस्थित राहीले.
- आदित्य ठाकरेंनीही केलं अभिवादन :शिवसेना नेते आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांनीदेखील आजोबांना अभिवादन करत एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आजोबांसोबतचा एक फोटो शेअर करत त्यावर मराठीत कॅप्शन दिलंय, "आज्या...स्मृतीस विनम्र अभिवादन!"
- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी एक्स मीडियावर पोस्ट करत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, "माझे विचार उद्धव ठाकरेजी, आदित्य आणि संपूर्ण शिवसेना परिवारासोबत आहेत."