नवी दिल्ली Kho-Kho World Cup : नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषकात भारतीय पुरुष आणि महिला संघांचं वर्चस्व दिसून आलं. महिला संघानं नेपाळला हरवून विश्वचषक जिंकला, तर पुरुष संघानंही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नेपाळला हरवून विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवलं. भारतीय पुरुष संघानं संपूर्ण स्पर्धेत अपराजित मोहीम कायम ठेवली, जी त्यांनी अंतिम सामन्यातही सुरु ठेवली. पुरुष संघानं नेपाळविरुद्धचा विजेतेपदाचा सामना 54-36 च्या फरकानं जिंकला. तर महिला संघानं 78-40 नं नेपाळला हरवत विश्वविजेतेपद मिळवलं. दोन्ही संघ विजेते झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वस्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय.
The Queens of #KhoKho 👸🏆 #TeamIndia’s women take the first-ever #KhoKhoWorldCup 🇮🇳✨#TheWorldGoesKho #Khommunity #KhoKho #KKWCWomen #KKWC2025 pic.twitter.com/CezSmnrIZv
— Kho Kho World Cup India 2025 (@Kkwcindia) January 19, 2025
माहिला संघ स्पर्धेत अपराजित : पहिलाच खो-खो विश्वचषक 13 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सुरु झाला आणि पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघानं 176 गुण मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा विजय मिळवला. या विजयानं टीम इंडियानं आपले इरादे स्पष्ट केलं आणि हा इरादा प्रत्येक संघाला उद्ध्वस्त करण्याचा होता. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यासह, भारतीय संघानं आपले हेतू प्रत्यक्षात आणला आणि विजेतेपद जिंकलं.
This is what winning the #KhoKhoWorldCup feels like 😍🏆
— Kho Kho World Cup India 2025 (@Kkwcindia) January 19, 2025
Congratulations, #TeamIndia! What an epic victory! 👏🔥#TheWorldGoesKho #Khommunity #KhoKho #KKWCMen #KKWC2025 pic.twitter.com/KPTOx1sN1h
पुरुष संघाचाही अंतिम सामन्यात दमदार विजय : या सामन्यात भारतीय पुरुष संघानं नेपाळचा 54-36 अशा फरकानं पराभव केला. अंतिम सामन्यात, नेपाळ संघानं नाणेफेक जिंकून बचाव करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय संघानं दमदार सुरुवात केली. पहिल्या टर्नवर आक्रमण करुन, भारतीय संघानं एकूण 26 गुण मिळवले. दुसऱ्या टर्नमध्ये आक्रमक खेळ करताना, नेपाळच्या संघाला 18 गुण मिळवता आले, ज्यामुळं भारतीय संघानं 8 गुणांची आघाडी घेतली. यानंतर, तिसऱ्या फेरीत, टीम इंडियानं 54 गुणांचा आकडा गाठला आणि 26 गुणांची आघाडी घेतली. शेवटच्या टर्नमध्ये नेपाळला 8 गुण मिळवता आले, ज्यामुळं भारतीय संघानं सामना एकतर्फी जिंकला.
From Tradition to Triumph! 🇮🇳🏆✨
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 19, 2025
Women’s Team Wins First-Ever Kho Kho World Cup!
What an incredible achievement!
Heartfelt congratulations to the Indian Women’s Team for clinching the first-ever Kho Kho World Cup!
This remarkable victory reflects their unmatched skill,… pic.twitter.com/xlqrUCjabb
पुरुष संघाची स्पर्धेत कामगिरी : पुरुषांच्या खो-खो विश्वचषकात एकूण 20 संघांनी भाग घेतला. यावेळी, भारतीय पुरुष संघ नेपाळ, पेरु, ब्राझील आणि भूतानसह गट अ मध्ये होता. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाकडून दमदार कामगिरी दिसून आली. ती प्रत्येक सामना जिंकण्यात यशस्वी झाली. भारतीय संघानं नेपाळला 42-37 असा पराभव करुन स्पर्धेची सुरुवात केली. यानंतर ब्राझीलचा 64-34 असा पराभव झाला. त्याच वेळी, त्यांनी पेरुविरुद्ध 70-38 असा विजय मिळवला. त्यानंतर भूतानलाही 71-34 नं हरवलं. त्याच वेळी, टीम इंडियानं नॉकआउट सामन्यांमध्येही एकतर्फी विजय मिळवला. त्यांनी क्वार्टर फायनलमध्ये श्रीलंकेचा 100-40 असा पराभव केला. यानंतर, उपांत्य फेरीत त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 60-18 असा विजय मिळवला. या दमदार कामगिरीमुळं भारतीय पुरुष संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला.
Today’s a great day for Indian Kho Kho.
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2025
Incredibly proud of Indian Men's Kho Kho team for winning the Kho Kho World Cup title. Their grit and dedication is commendable. This win will contribute to further popularising Kho Kho among the youth. pic.twitter.com/OvzUV6SpX0
हेही वाचा :