हैदराबाद : अर्थसंकल्पासंदर्भात सखोल आर्थिक विश्लेषण जाणून घेण्याअगोदर आपण अर्थसंकल्प म्हणजे काय? त्याचा उद्देश काय? हे अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया. अर्थसंकल्प ही एक आर्थिक प्रक्रिया आहे. यामध्ये सरकार संसदेला आणि जनतेला सरकारचे उत्पन्न, खर्च आणि कर्जाची माहिती देते.
केंद्रीय अर्थसंकल्पात मागील आर्थिक वर्षातील सरकारच्या आर्थिक कामगिरीचं पुनरावलोकन केलं जातं. सरकारनं किती कमावले?, किती खर्च केले? किती कर्ज घेतले? याची तपशीलवार माहिती यात दिली जाते. याव्यतिरिक्त, सरकार आगामी आर्थिक वर्षासाठी अंदाज प्रदान करते. अपेक्षित उत्पन्न, नियोजित खर्च आणि कोणतीही कमतरता पूर्ण करण्यासाठी अपेक्षित कर्जाची रूपरेषा देते. मूलत: अर्थसंकल्प हे सरकारच्या आर्थिक आरोग्याचं आणि योजनांचे प्रतिबिंब असतं.
अर्थसंकल्पाचं महत्त्व काय? : अर्थसंकल्प हा केवळ सरकारच्या निधीसाठी नाही तर थेट करदात्यांच्या पैशाशीदेखील संबंधित आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी एकदा म्हटल्याप्रमाणे, सरकारकडं नागरिकांच्या कमाईशिवाय दुसरा कोणताही पैसा नाही. जेव्हा सरकार खर्च करते, तेव्हा ते नागरिकांच्या बचतीतून कर्ज घेऊन किंवा त्यांच्यावर कर लावून करते. याचा अर्थ असा की कोणतीही वित्तीय तूट किंवा खर्च पूर्ण करण्यासाठी सरकार कर्ज घेते किंवा त्या कर्जात भर घालते. सरकारनं घेतलेल्या कर्जाची किंमत नागरिकांच्या वर्तमान आणि भावी पिढ्यांना शेवटपर्यंत मोजावी लागते.
मागोवा घेणं महत्त्वाचं - अर्थसंकल्पात प्रत्येकावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला जातो. यामध्ये कर धोरणे, खर्चाचे प्राधान्य आणि सरकारी अनुदान यांचा समावेश आहे. नागरिकांनी कोणावर कर आकारला आहे? शिक्षण आणि आरोग्य सेवेसारख्या अत्यावश्यक क्षेत्रांवर किती खर्च केलाय? त्यांनी त्यांची खरोखर गरज आहे का? त्यांच्यापर्यंत अनुदान पोहोचते का? याचा मागोवा घेणं महत्त्वाचं आहे. सरकारची वित्तीय धोरणं देशाचे आर्थिक आरोग्य ठरवतात.
अर्थसंकल्पावर लक्ष ठेवणं सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचं आहे. कारण कालांतरानं काळजीपूर्वक वित्तीय व्यवस्थापनामुळं मजबूत आर्थिक वाढ आणि स्थिरता येऊ शकते. याउलट, वित्तीय तुटीकडं दुर्लक्ष केल्यानं आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, आर्थिक धोरणे चुकीची असल्यानं पाकिस्तानसारखा देश दिवाळखोरीत पोहोचला आहे. अर्थसंकल्प केवळ वर्तमानच नाही तर देशाच्या आर्थिक भविष्यालाही आकार देतो.
केंद्रीय अर्थसंकल्प का महत्त्वाचा आहे?
- महागाई आणि कर धोरणं निश्चित होतात.
- नवीन रोजगार संधी आणि उद्योग धोरणं ठरतात.
- सरकारी योजनांना आर्थिक पाठबळ मिळतं.
- शेअर बाजार आणि गुंतवणुकीवर थेट परिणाम होतो.
हेही वाचा -