ETV Bharat / state

मासे पकडण्याकरिता गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू, दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू - TWO YOUTHS DROWN

नांदेडमध्ये मासे पकडण्यासाठी तळ्यात गेलेल्या दोन तरुणांसोबत अनर्थ घडला आहे. एका तरुणाचा मृत्यू सापडला असून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे.

nanded mukhed two youths who went fishing drowned in a lake, one died and other is missing, Search operation underway
नांदेडमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2025, 8:32 AM IST

नांदेड : मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणावर काळानं घाला घातला. जाळे टाळण्यासाठी तळ्यात उतरलेल्या दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघजण तलावात बुडाले. ही घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील गडग्याळवाडी येथे शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. दरम्यान, दोन्ही तरुणांपैकी संतोष हणमंतराव मामीलवाड (वय 27) याचा मृतदेह सापडलाय. तर अजित विश्वाबंर सोनकांबळे (वय 23) याचा रेस्क्यू टीमकडून शोध घेतला जातोय.

नेमकं काय घडलं? : मुखेड येथील तरुण अजित सोनकांबळे आणि गडग्याळवाडी येथील संतोष मामीलवाड 18 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास गडग्याळवाडी येथील तलावात जाळं घेऊन मासे पकडण्यासाठी गेले होते. दोघंही कपडे, चप्पल आणि मोबाईल काढून तळ्याच्या पाण्यात उतरले. मात्र, मासे पकडत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यातच एकाचा जाळ्यात पाय अडकून पाण्यात बुडाला. तर दुसरा बेपत्ता झाल्याचं सांगितलं जातंय. घटनेची माहिती मृत तरुण संतोष मामीलवाड याच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर तहसीलदार राजेश जाधव, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलीस कर्मचारी व्यंकट जाधव, रुकेश हासुळे, तलाठी यांनी घटनास्थळी जात घटनास्थळाची पाहणी केली.

सदरील घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन रेस्क्यू टीमला पाचारण केलं. या टीमच्या माध्यमातून दोन्ही तरुणांचा रविवारी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शोध घेण्यात आला. या शोधमोहीमेत गडग्याळवाडी येथील रहिवाशी असलेला संतोष याचा मृतदेह पाण्यात मासे पकडण्याच्या जाळीत अडकलेल्या अवस्थेत सापडला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे पाठवण्यात आला. मात्र, त्याच्यासोबतचा दुसरा तरुण अजित सोनकांबळे याचा अद्याप शोध लागलेला नाही. ही शोधमोहीम रविवारी सायंकाळी थांबविण्यात आली. आजपासून पुन्हा सकाळपासून शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेनं सोनकांबळे आणि मामीलवाड कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -

  1. इंद्रायणी नदीत दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; एक मित्र बुडू लागला म्हणून इतर दोघे गेले अन्... - Indrayani Drown Death News
  2. बांद्रा येथील कॉलेजचे चार तरुण खालापूर धरणात बुडाले - Maharashtra Breaking News Live
  3. उजनी धरणात बोट बुडाल्यानं सहा जण बेपत्ता, धाडसानं पोहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे वाचले प्राण - Ujani dam news

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.