तेल अवीव : गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम लागू झालाय. युद्धविराम करारानुसार पॅलेस्टिनी संघटना हमासनं रविवारी (19 जाने.) तीन महिला इस्रायली ओलिसांची सुटका केली. त्यामुळं आता इतर सर्व ओलिसांच्या लवकर सुटकेसाठी इस्रायलयची जनता प्रतिक्षा करत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही आपण सर्व ओलिसांच्या सुटकेसाठी वचनबद्ध असल्याचं म्हटलंय.
इस्रायलचे पंतप्रधान काय म्हणाले? : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलंय की, "इस्रायल सरकार परत आलेल्या तिन्ही ओलीस महिलांचं आनंदान स्वागत केलं. आम्ही तिन्ही महिलांच्या कुटुंबियांसोबत आहोत. तसंच इस्रायल सरकार सर्व ओलीस आणि बेपत्ता व्यक्तींच्या परतीसाठी वचनबद्ध आहोत."
Reunited at last. pic.twitter.com/l91srqby5c
— Israel Defense Forces (@IDF) January 19, 2025
471 दिवस हमासच्या बंदिवासात राहिल्यानंतर तीन महिला ओलीस आज मायदेशी परतल्यात. आज आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अभिवादन करतो. रोमी गोनेन, एमिली डमारी आणि डोरोन स्टेनब्रेचर अशी या महिलांची नावं आहेत. - रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी, इस्रायल संरक्षण दलाचे प्रवक्ते
जो बायडेन यांची प्रतिक्रिया : यासंदर्भात अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, "मी गेल्या वर्षी मे महिन्यात मध्यपूर्वेसाठी केलेला करार अखेर यशस्वी झाला. युद्धविराम करारानुसार गाझामधील तोफा शांत झाल्यात. सध्या, तीन इस्रायली महिलांची सुटका करण्यात आलीय. सात दिवसांत आणखी चार महिलांची सुटका केली जाईल. त्यानंतर दर सात दिवसांनी तीन ओलिसांची सुटका केली जाईल." तसंच पहिल्या टप्प्यात सोडण्यात येणाऱ्या ओलिसांमध्ये किमान दोन अमेरिकन नागरिकांचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं.
This is what we’ve been fighting for, for over 471 days. Welcome home Emily, Doron and Romi 🇮🇱 pic.twitter.com/VIXyaP1ntY
— Israel Defense Forces (@IDF) January 19, 2025
दरम्यान, 7 ऑक्टोबर 2023 पासून तिन्ही महिलांना 471 दिवस ओलीस ठेवण्यात आलं होतं. हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलवर हल्ला करून त्यांना ओलीस ठेवलं. या हल्ल्यात 1,200 हून अधिक लोक मारले गेले होते. या काळात 200 हून अधिक लोकांचं अपहरण करण्यात आलं. दुसरीकडं, इस्रायलनं हमासविरुद्ध केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये 46,000 हून अधिक पॅलेस्टिनीही मारले गेले. यापूर्वी, नोव्हेंबर 2023 मध्ये आठवडाभर चाललेल्या युद्धविराम दरम्यान 100 हून अधिक ओलिसांची सुटका करण्यात आली होती.
हेही वाचा -