मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर आता 26 जानेवारी या भारतीय प्रजासत्ताक दिनी (Republic Day) कुठल्या जिल्ह्यात कोणत्या मंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन (Flag Hoisting) होईल याची यादी सरकारनं जाहीर केलीय. राज्यातील काही मंत्र्यांना दोन दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजवंदन करतील याबाबत उत्सुकता होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. त्यामुळं ते नेमके कुठे ध्वजवंदन करतील याचीही अनिश्चितता आता दूर झाली आहे.
कोण कोठे ध्वजवंदन करणार? : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम होईल. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. त्यामुळं गडचिरोली येथील ध्वजवंदनाची जबाबदारी गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांना देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळं ते त्यांचा गृह जिल्हा असलेल्या ठाणे येथे ध्वजवंदन करतील. तर मुंबई शहर जिल्ह्यातील ध्वजवंदन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री असलेले मंगल प्रभात लोढा करतील. मुंबई उपनगर जिल्ह्यात पालकमंत्री आशिष शेलार ध्वजारोहण करतील. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. त्यामुळं ते प्रजासत्ताक दिनी त्यांच्या गृह जिल्हा असलेल्या पुणे येथे ध्वजवंदन करतील. तर बीड येथील ध्वजवंदनाची जबाबदारी राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्री बनवण्यात आलं आहे. ते नागपूर या त्यांच्या गृह जिल्ह्यात ध्वजवंदन करतील तर अमरावतीमध्ये इंद्रनील नाईक ध्वजवंदन करतील.
बीड आणि अमरावती कोण करणार ध्वजवंदन? : दत्ता भरणे आणि इंद्रनील नाईक यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री बनवण्यात आलेले नाही. त्यामुळं त्यांना भरणे यांना बीड जिल्ह्यात ध्वजवंदन करण्याचा सन्मान देण्यात आला आहे, तर नाईक यांना अमरावती जिल्ह्यात ध्वजवंदन करण्याचा सन्मान देण्यात आला आहे.
ध्वजवंदनाचा कार्यक्रम कधी असणार? : भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2025 ला ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभरात एकाच वेळी म्हणजे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळं या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागानं कळवलं आहे. प्रजासत्ताक दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात येतील.
कोणत्या जिल्ह्यात कोण आहे पालकमंत्री?
ठाणे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर - राधाकृष्ण विखे पाटील, वाशिम - हसन मुश्रीफ
सांगली - चंद्रकांत पाटील
नाशिक - गिरीश महाजन
पालघर - गणेश नाईक
जळगाव - गुलाबराव पाटील
यवतमाळ - संजय राठोड
मुंबई शहर - मंगलप्रभात लोढा
मुंबई उपनगर - ॲड.आशिष शेलार, रत्नागिरी- उदय सामंत
धुळे - जयकुमार रावल
जालना - पंकजा मुंडे
नांदेड - अतुल सावे
चंद्रपूर - अशोक उईके
सातारा - शंभुराज देसाई
बीड - दत्तात्रय भरणे
रायगड - आदिती तटकरे
लातूर - शिवेंद्रसिंह भोसले
नंदुरबार - ॲड माणिकराव कोकाटे
सोलापूर - जयकुमार गोरे
हिंगोली - नरहरी झिरवाळ
भंडारा - संजय सावकारे
छत्रपती संभाजीनगर - संजय शिरसाट, धाराशिव- प्रताप सरनाईक
बुलढाणा - मकरंद जाधव (पाटील)
सिंधुदुर्ग - नितेश राणे
अकोला - आकाश फुंडकर
गोंदिया - बाबासाहेब पाटील
कोल्हापूर - प्रकाश आबिटकर
गडचिरोली - ॲड. आशिष जयस्वाल
वर्धा - पंकज भोयर
परभणी - मेघना साकोरे - बोर्डीकर
अमरावती - इंद्रनील नाईक
हेही वाचा -
- 'ऐ मेरे वतन के लोगों' गीत अजरामर, संगीतकार सी. रामचंद्र यांचं जन्मगाव मात्र दुर्लक्षित - Independence Day 2024
- देशभरात साजरा होतोय 78 वा स्वातंत्र्यदिन; 'प्रजासत्ताक दिनी' आणि 'स्वातंत्र्य दिनी' राष्ट्रध्वज फडकवण्यात 'हा' फरक - Independence Day 2024
- अटारी-वाघा बॉर्डरवर प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, पाहा नेत्रदीपक बीटिंग रिट्रीट सोहळा