ETV Bharat / health-and-lifestyle

बद्धकोष्ठता ठरू शकते कर्करोगाला निमंत्रण! पहा तज्ञ काय म्हणतात - CONSTIPATION AND CANCER

बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण बद्धकोष्ठतेमुळे कर्करोग देखील होऊ शकतो.

CAN CONSTIPATION CAUSE CANCER  SYMPTOMS OF CONSTIPATION  CONSTIPATION CAUSE CANCER
बद्धकोष्ठता (Freepik)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Feb 26, 2025, 11:31 AM IST

Updated : Feb 26, 2025, 12:16 PM IST

Can Constipation Cause Cancer: आजकाल बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य झाली आहे. जवळजवळ प्रत्येकाला कधी ना कधी बद्धकोष्ठतेचा सामना करावा लागला असेलच. ही एक पचनक्रियेशी निगडित समस्या आहे. यामध्ये मल कोरडं आणि कडक होते. परिणामी शौचाच्या वेळी आपल्याला त्रास सहन करावा लागतो. ही समस्या जरी सामान्य वाटत असली तरी याचे दुष्परिणाम अनेक आहेत. बद्धकोष्ठतेमुळे कर्करोग देखील होऊ शकतो? अशा परिस्थितीत, तुम्हाला बद्धकोष्ठतेबद्दल खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

CAN CONSTIPATION CAUSE CANCER  SYMPTOMS OF CONSTIPATION  CONSTIPATION CAUSE CANCER
बद्धकोष्ठता (ETV Bharat)

बद्धकोष्ठता ही एक अशी समस्या आहे ज्याचा सामना आज प्रत्येकजण करत आहे. बद्धकोष्ठता कधी कर्करोगात रूपांतरित होईल हे सांगणे कठीण आहे. आजच्या काळात सतत बद्धकोष्ठतेमुळे होणाऱ्या कर्करोगाच्या समस्येबद्दल ईटीव्ही भारतने पीजीआयच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ए. यांनी डॉ. विशाल शर्मा यांच्याशी खास संवाद साधला.

CAN CONSTIPATION CAUSE CANCER  SYMPTOMS OF CONSTIPATION  CONSTIPATION CAUSE CANCER
बद्धकोष्ठता (Freepik)

ईटीव्ही भारतला माहिती देताना, डॉ. विशाल शर्मा म्हणाले की, जेव्हा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते तेव्हा शौचालयात गेल्यानंतरही पोट व्यवस्थित साफ होत नाही. कधीकधी विष्ठेसोबत रक्त येऊ लागते. आजकाल, खाण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यामुळे, वृद्धांमध्ये बद्धकोष्ठता सामान्य झाली आहे. एवढेच नाही तर, आता मुलांमध्येही बद्धकोष्ठता अधिक प्रमाणात दिसून येत आहे, असेही ते म्हणाले.

  • बद्धकोष्ठतेची लक्षणं
  • शौचाच्यावेळी त्रास
  • मल कोरडं आणि कडक होणे
  • मलासोबत रक्त येणे
  • अचानक वजन कमी होणे
  • पोटदुखी.
  • बद्धकोष्ठता का होते?

डॉ. विशाल शर्मा यांच्या मते, सतत जंक फूड खाणे, आहारात फायबरची कमतरता आणि स्वतःला हायड्रेट न करणे ही बद्धकोष्ठतेची मुख्य कारणे आहेत. अशा लोकांचे अन्न पोटात व्यवस्थित पचत नाही, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढतच जाते.

  • बद्धकोष्ठतेमुळे कर्करोग होऊ शकतो का?

डॉक्टरांनी सांगितले की सतत बद्धकोष्ठतेमुळे मल कठीण होतो, ज्यामुळे मोठ्या आतड्यात अल्सर होतात. या जखमांमधून रक्त वाहू लागते. कधीकधी या कारणांमुळे झालेले अल्सर नंतर कर्करोगात बदलतात. डॉक्टरांच्या मते, अशा परिस्थितीत लोकांनी जागरूक राहणं खूप महत्वाचं आहे. बद्धकोष्ठतेची समस्या लवकर ओळखल्यास त्यावर सहज उपचार करता येवू शकते. परंतु, जर ही समस्या हलक्यात घेतली आणि दुर्लक्ष केलं तर, यावर उपचार होणं कठीण होतं.

बद्धकोष्ठता टाळण्याचे मार्ग

  • जंक फूड आणि फास्ट फूड कमी प्रमाणात खावे.
  • तुमच्या आहारात भाज्या आणि संपूर्ण धान्ये समाविष्ट करा.
  • ताण कमी करण्यासाठी योग आणि ध्यान करा.
  • भरपूर पाणी प्या.
  • दारू, सिगारेट आणि ड्रग्जपासून दूर रहा.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

Last Updated : Feb 26, 2025, 12:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.