सिडनी AUSW vs ENGW 1st T20I Live Streaming : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात महिला अॅशेस होत आहे. यात दोन्ही संघांमध्ये तीन वनडे, तीन T20 आणि एक कसोटी सामना खेळला जाईल. यातील वनडे मालिका खेळली गेली आहे. जिथं ऑस्ट्रेलियन महिला संघानं इंग्लंड महिला संघाला 3-0 नं पराभूत केलं आहे. यानंतर आता तीन सामन्यांची T20 मालिका सुरु होत आहे. यातील पहिला सामना आज 20 जानेवारी (रविवार) रोजी सिडनी इथं खेळवला जाईल.
Fresh format. Bring it on 💪
— England Cricket (@englandcricket) January 19, 2025
A more friendly time back in the UK too 😂 pic.twitter.com/QwJiaMTAQX
वनडे मालिका विजयासह ऑस्ट्रेलिया अॅशेस जिंकण्याच्या जवळ : महिला अॅशेस विजेतेपद जिंकण्यासाठी, संघाला तीन वनडे, तीन T20 आणि एक कसोटी सामना खेळावा लागतो. जिथं प्रत्येक वनडे आणि T20 सामना जिंकण्यासाठी 2-2 गुण दिले जातात. तर कसोटी सामना जिंकल्यानं चार गुण मिळतात. या प्रकारे एकूण गुण 16 आहेत. ऑस्ट्रेलियानं 6 गुण मिळवले आहेत. अशा परिस्थितीत, जर ऑस्ट्रेलियन संघानं आगामी T20 मालिकेत एक सामना जिंकला तर त्यांना 8 गुण मिळतील. यानंतर, त्यांनी सामने हरले तरी त्यांना काही फरक पडणार नाही. ते महिला अॅशेस विजेतेपद राखेतील.
📍SCG. Pretty iconic. pic.twitter.com/Fqql3k949G
— England Cricket (@englandcricket) January 19, 2025
T20I मध्ये दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : T20 क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात सर्वाधिक सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत 40 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियानं 23 सामने जिंकले आहेत. तर, इंग्लंडला फक्त 10 सामने जिंकता आले आहेत. आणि 7 सामने अनिर्णीत राहिले आहेत. विशेष म्हणजे इंग्लंड महिला क्रिकेट संघाला 8 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियामध्ये T20 सामना जिंकता आलेला नाही. त्यांनी 21 नोव्हेंबर 2017 रोजी शेवटचा T20 सामना जिंकला होता. त्यामुळं या सामन्यात विजय मिळवत ते आपली पराभवाची मालिका खंडीत करण्याचा प्रयत्न करतील.
Pumped to open the T20 series at one of Australia's most iconic grounds this evening 🤩
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) January 19, 2025
Get your tickets: https://t.co/dERZ2byIQj #Ashes pic.twitter.com/bxiCAgCQSU
खेळपट्टी कशी असेल : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियन महिला संघाचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर फलंदाजांना खूप मदत मिळते. या मैदानावर स्लो बॉलरना अडचणी येऊ शकतात. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगला उसळी मिळू शकतो. पॉवरप्लेमध्ये जलद गोलंदाज लवकर स्विंगचा फायदा घेऊ शकतात. या ट्रॅकवर प्रथम फलंदाजी करणे हा योग्य निर्णय ठरु शकतो.
Annabel Sutherland certainly looks ready for some T20 cricket!
— cricket.com.au (@cricketcomau) January 19, 2025
The T20 leg of the #Ashes kicks off tonight at the SCG 👀 pic.twitter.com/LSNgUIQbQ5
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघात पहिला T20 सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघात पहिला T20 सामना 20 जानेवारी (रविवार) रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 01:45 वाजता सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी इथं खेळला जाईल. ज्याची नाणेफेक अर्धातास आधी होईल.
Keen for some T20 fireworks at the @SCG on Monday night!
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) January 18, 2025
See ya there: https://t.co/dERZ2byIQj #Ashes pic.twitter.com/sunOMVMThM
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघात पहिला T20 सामना कुठं आणि कसा पाहायचा?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघातील T20 मालिका भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे अधिकृतपणे प्रसारित केली जाईल. अशा परिस्थितीत पहिला T20 सामना स्टार स्पोर्ट्स टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. यासोबतच, या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अधिकृत ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने+हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
ऑस्ट्रेलिया : एलिसा हिली (कर्णधार), अॅशले गार्डनर, किम गार्थ, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम
इंग्लंड : हीथर नाइट (कर्णधार), माया बोचियर, अॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, डॅनी गिब्सन, एमी जोन्स, नॅट सायव्हर-ब्रंट, डॅनी व्याट-हॉज
हेही वाचा :