मुंबई - अखेर 'बिग बॉस सीझन 18'ला त्याचा विजेता मिळाला आहे. करणवीर मेहरानं 50 लाख रुपयांसह चमकदार ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान आता करणची तुलना अभिनेता सिद्धार्थ शुक्लाशी केली जात आहे. सीझन 13चा विजेता झाल्यानंतर सिद्धार्थला मिळालेली ट्रॉफी देखील अशीच होती. आता जेव्हा करणला यावर प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यानं सिद्धार्थबद्दल एक चांगली गोष्ट सांगितली. सध्या करण आणि सिद्धार्थची तुलाना सोशल मीडियावर देखील केली जात आहेत. करणवीर मेहरानं अंतिम फेरीनंतर माध्यमांशी संवाद करताना सिद्धार्थ शुक्लाबद्दल म्हटलं, "ही तीच ट्रॉफी आहे, तो खूप छान मुलगा होता. तो माझा खूप चांगला मित्र होता. आम्ही जास्त वेळ एकत्र घालवला नाही, मात्र आम्ही दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होतो. माझी तुलना त्याच्याशी होत आहे, याबद्दल मला आनंद आहे. त्याचे मन खूप मोठे होते. तो एक चांगला व्यक्ती होता."
करणवीर मेहरानं सांगितला सिद्धार्थ शुक्लाबद्दल किस्सा : करणवीर पुढं म्हटलं, " मला आठवतंय, जेव्हा मी नुकताच मुंबईला आलो होतो. त्यावेळी त्याच्याकडे एक चांगली बाईक होती. मी त्याला विनंती केली होती की, मला माझ्या पोर्टफोलिओसाठी एक फोटो काढायचा आहे, तर मी तुमच्या बाईकजवळ उभा राहून फोटो काढू शकतो का? यानंतर तो खाली आला आणि त्यानं मला त्याच्या बाईकची चावी दिली. त्यानं म्हटलं, बाईक चालवताना फोटो काढ, जर कोणी मित्र इतकी महागडी बाईक सहज देत असेल तर, त्याचं मन किती मोठे असेल. त्याचं मन खूप मोठ होतं. मला त्याची आठवण येते आणि मलाही त्याच्याबरोबर हा क्षण शेअर करायचा आहे."
शहनाज गिलनं केलं करणवीर मेहराचं अभिनंदन : शहनाज गिलनं करणवीर मेहराचं त्याच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. तिनं ट्विटरवर लिहिलं, 'विजय तुम्हाला शोभतो. करणवीर मेहरा,अभिनंदन.' याशिवाय चाहतेही त्याचं सोशल मीडियाच्या माध्यामातून खूप अभिनंदन करत आहेत. तसेच यापूर्वी करणनं 'खतरों के खिलाडी सीझन 14' सुद्धा जिंकला आहे. याशिवाय सध्या काहीजण नाराज आहेत. विवियन डिसेना हा विजयी न झाल्यामुळे अनेकजण आपला भावना सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. विवियन डिसेनाला 'बिग बॉस 18'च्या सर्वात मजबूत स्पर्धकांपैकी एक मानल्या जात होतं. मात्र तो ट्रॉफी जिंकण्यापासून वंचित राहिला. रविवारी मुंबईत झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खाननं करण वीर मेहराला विजेता घोषित केलं. विवियन हा पहिला उपविजेता ठरला. 'बिग बॉस 18' मध्ये विवियननं आपल्या अनोख्या खेळानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
हेही वाचा :